शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Terror Funding : पाकिस्तानला FATF कडून पुन्हा झटका, ग्रे लिस्टमध्येच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 08:35 IST

गुरूवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच राहणार असल्याचं ठरवण्यात आलं.

ठळक मुद्देगेल्या वेळी ६ निकष पूर्ण झाले नाहीतगुरूवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच राहणार असल्याचं ठरवण्यात आलं.

पाकिस्तान फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमध्ये कायम राहणार आहे. पाकिस्तानकडूनदहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना सतत पाठिंबा दिला जातो. अशातच एफएटीएफच्या अॅक्शन प्लॅनच्या २७ निकषांपैकी ३ निकष पूर्ण करण्यात पाकिस्तानला अपयश आलं. गुरूवारी यासंदर्भातील एक बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं. बऱ्याच वेळेपासून पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु त्याला यश मिळालेलं नाही. पाकिस्तान निर्धारित २७ निकषांपैकी ३ महत्त्वाचे निकष पूर्ण करू शकला नाही. "पाकिस्तानवर आताही देखरेख ठेवली जाणार आहे. टेटर फायनॅन्सिंगबाबत अद्यापगी काही गंभीर त्रुटी आहेत. पाकिस्ताननं काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. परंतु २७ निकषांपैकी ३ निकष अद्यापही पूर्ण झालेले नाहीत," अशी प्रतिक्रिया एफएटीएफचे प्रमुख मार्कस प्लीयर यांनी दिली. गेल्या वेळी ६ निकष पूर्ण झाले नाहीत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळीही पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात आलं होतं. तेव्हा एफएटीएफमध्ये तुर्कस्थाननं २७ पैकी ६ निकषांना पूर्ण करण्यासाठी वाट पाहण्याऐवजी सदस्यांना पाकिस्तानच्या चांगल्या कामावर विचार करायला हवा, असा प्रस्ताव सादर केला होता.एफएटीएफनं गुरूवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीबाबात चर्चा केली. परंतु पाकिस्ताननं २७ पैकी २४ निकष पूर्ण केले. पाकिस्ताननला देण्यात आलेली वेळही संपली होती. एफएटीएफनं पुन्हा एकदा पाकिस्तानला जून २०२१ पूर्वी या सर्व निकषांना पूर्ण करण्यास सांगितलं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानTerrorismदहशतवाद