शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:37 IST

Howard Lutnick : यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी भारताचं कौतुक केलं. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हॉवर्ड लॅटनिक म्हणाले, "मी भारताचा खूप मोठा फॅन आहे आणि भारत सरकारमधील लोकांनाही हे माहित आहे. माझे एक जवळचे मित्र निकेश अरोरा भारतीय आहेत. मी जेव्हा भारतात जायचो तेव्हा आम्ही घरी पार्टी करायचो, क्रिकेट खेळायचो आणि खूप मजा करायचो. भारतात घालवलेला वेळ माझ्यासाठी एक खास अनुभव आहे."

"आजच्या जगात मोदी आणि ट्रम्प यांच्यासारखे नेते दुर्मिळ"

लॅटनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरही भाष्य केलं. "डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या प्रशासनातील एकमेव नेते आहेत ज्यांना संपूर्ण अमेरिकेतील लोकांनी निवडून दिलं आहे, जसा नरेंद्र मोदींना भारतात संपूर्ण देशाचा जनादेश मिळाला आहे. जगात असे फार कमी नेते आहेत ज्यांना त्यांच्या देशातील लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून दिलं आहे.  मोदी आणि ट्रम्प यांच्यासारखे नेते दुर्मिळ आहेत. म्हणूनच त्यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आणि खास आहेत" असं सांगितलं. 

 लवकरच होऊ शकतो करार

"ज्या देशांनी जलद पावलं उचलली आहेत, त्यांच्यासोबत चांगले करार होतात. मला वाटतं की, भारतही तेच करत आहे आणि मी त्यांचं कौतुक करतो. पूर्वी असे करार होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागायची, परंतु आता आम्ही ते एका महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे देशांमधील सामान्य व्यापार प्रक्रियेपेक्षा वेगळे आहे. मला वाटतं की, आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत आणि अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो, कारण आम्हाला असा मार्ग सापडला आहे जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे" असंही हॉवर्ड लॅटनिक यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी