वसमत (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुरुंदा आणि परिसरात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम आहे. मंगळवारी (१२ मे) सायंकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी या भागात पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. जमिनीच्या खालून मोठा आवाज आल्यानंतर कंपने जाणवल्याने नागरिकांनी भीतीने घराबाहेर मोकळ्या जागेत धाव घेतली.
दोन महिन्यात पाच धक्के
एप्रिल महिन्यात या भागात चार वेळा भूकंपाचे धक्के बसले होते. आता मे महिन्यातही हे सत्र सुरू झाल्याने स्थानिकांच्या मनात चिंतेचे काहूर माजले आहे. मंगळवारच्या धक्क्याने पांगरा शिंदेसह डोणवाडा, वापटी, कुपटी, शिरळी आणि खांबाळा ही गावे हादरली. सुदैवाने, यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
विकासाला खीळ, बांधकामे रखडली
सततच्या या नैसर्गिक संकटामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांच्या बांधकामांना तडे जाण्याच्या भीतीने नागरिकांनी नवीन बांधकामे थांबवली आहेत. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मदतीने या भागाची पाहणी करावी आणि नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
Web Summary : Vasmat, Hingoli, experienced another earthquake, causing panic. This follows a series of tremors in April and May, disrupting life and halting construction. Villages like Pangra Shinde felt the impact. No casualties reported. Residents urge investigation.
Web Summary : हिंगोली जिले के वसमत में फिर भूकंप आया, जिससे दहशत फैल गई। अप्रैल और मई में कई झटकों के बाद लोगों में चिंता है। पांगरा शिंदे जैसे गांवों में असर हुआ। जान-माल का नुकसान नहीं। जांच की मांग उठी।