वसमत (जि. हिंगोली): वसमत-परभणी महामार्गावर काटेरी फांद्या टाकून वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात पकडले आहे. ११ मे रोजी वसमतमधील साई नगर भागातून चोरीला गेलेली हळद आणि पिकअप वाहनाचा तपास करत असताना पोलिसांना ही मोठी यशप्राप्ती झाली.
छापा आणि अटक
सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाने महामार्गावर सापळा रचून छापा टाकला. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण पसार झाले, मात्र पोलिसांनी जसविंदर सिंग उर्फ जस्सू चव्हाण (वय २२), बादलसिंग चव्हाण (१९) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खंजीर, मिरची पूड, दोरी आणि लोखंडी रॉड अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गुन्ह्यांची कबुली
आरोपींनी चौकशीत वसमतमधील ३ आणि आखाडा बाळापूर येथील १ अशा एकूण ४ घरफोड्यांसह पिकअप वाहन चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख रुपयांची हळद, चोरीची पिकअप गाडी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Web Summary : Hingoli LCB arrested a gang preparing for robbery near Wasmat, seizing weapons. They confessed to multiple burglaries and a vehicle theft. Police recovered stolen turmeric, a pickup truck, gold jewelry, and cash worth ₹5 lakh.
Web Summary : हिंगोली एलसीबी ने वसमत के पास डकैती की तैयारी कर रहे एक गिरोह को गिरफ्तार किया, हथियार जब्त किए। उन्होंने कई चोरियों और एक वाहन चोरी कबूल की। पुलिस ने 5 लाख रुपये की चोरी की हल्दी, एक पिकअप ट्रक, सोने के गहने और नकदी बरामद की।