शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, वेळीच माहीत करून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 7:51 PM

आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

शरीर चांगले आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं महत्वाचं असतं. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर वेगवेगळे आजार उद्भवतात.  दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायालाच हवे. तुम्ही रोज पाणी पुरेश्या प्रमाणात पाणी पित असाल पण पाणी पित असताना काही चुका केल्यानं आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.  आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

उभं राहून कधीही पाणी पिऊ नये उभं राहून पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी पोटाच्या खालच्या भागात पाणी जाते. त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नाही. तुम्ही उभं राहून पाणी पित राहाला तर कालांतराने गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पाणी पिऊनही शरीर  हायड्रेट राहत नाही.  शक्य असल्यास बाटलीने पाणी पिणं टाळून ग्लासनं पाणी प्या. जर तुम्ही आजारी असाल तर जास्तीत जास्त पाणी प्या.

पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

गरम पाणी पिण्याचे फायदे

1) सकाळी लवकर उठून गरम पाणी पिल्याने पचनक्रिया संतुलित राहते. जेवण लवकर आणि सहज पचतं.

2) सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराचं वजन नियंत्रित राहतं. यामुळे शरीरातील तापमान वाढण्यासही मदत मिळते.

3) आजकाल वेळेच्याआधीच म्हातारपण येताना बघायला मिळतं. जर तुम्हालाही वयाच्या आधीच म्हातारप नको असेल तर सकाळी उठून रोज गरम पाणी नक्की प्यावे. 

4) रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने कफ, वात आणि पित्तसारख्या समस्याही होत नाहीत.

5) गरम पाणी त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. गरम पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWaterपाणीWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स