Drug rlf 100 also known as aviptadil shows dramatic results for critical covid 19 patients | युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

कोरोनाची लस तयार करण्याचे काम जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. या माहामारीतून बाहेर येण्यासाठी जगभरातील देशांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणतीही लस  कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे.  तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार या वर्षांच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल. अमेरिकेतील आरोग्य संस्थेनं कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी नवीन औषधाला परवागनी दिली आहे. 

या औषधाचं नाव आरएलएफ-100 (RLF-100) आहे. या औषधाला एविप्टाडिल (Aviptadil) नावाने ओळखलं जातं. अमेरिकेतील ह्यूस्टन शहरातील रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारांदरम्यान या औषधांचा वापर केला आहे.  गंभीर स्वरुपात आजारी असलेले रुग्ण म्हणजेच ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अशा रुग्णांवर सकारात्मक बदल झालेला आहे. अमेरिकेतील खाद्य आणि औषधी प्रशासन म्हणजे  एफडीएनं आपालकालिन स्थितीत कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाच्या वापराला परवागनी दिली आहे.

अहवालानुसार या औषधाला न्यूरोएक्स आणि रिलीफ थेराप्यूटिक्सनं मिळून तयार केलं आहे. न्यूरोएक्स ही औषध तयार करणारी कंपनी आहे. संधोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधानं फुफ्फुसांच्या पेंशींमध्ये मोनोसाईट्समध्ये कोरोना व्हायरसची  वाढ होण्यापासून रोखते. रिपोर्ट्सनुसार  ५४ वर्षीय व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणानं गंभीर स्वरुपाचा आजारी होता. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती.  या रुग्णाला हे औषध देण्यात आलं. हे औषध दिल्यानंतर चार दिवसांच्या आत त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवरून हलवण्यात आलं. याशिवाय १५ पेक्षा जास्त अन्य कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

दरम्यान बुधवारी लुपिन कंपनीनं कोविहॉल्ट ब्रँण्ड नावाने बाजारात औषध उतरवलं आहे. हे औषध कोरोनाच्या सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल. फार्मा कंपनी लुपिनं दिलेल्या माहितीनुसार फेविपिरावीरला DCGI कडून आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी परवानी मिळाली आहे. कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध २०० मिलिग्रामच्या १० गोळ्यांच्या स्ट्रीपच्या स्वरुपात उपलब्ध होईल. त्यातील प्रत्येक गोळीची किंमत ४९ रुपये असणार आहे.

खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा

आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Drug rlf 100 also known as aviptadil shows dramatic results for critical covid 19 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.