शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून रक्त घेता येणार नाही ! नियमांचे उल्लंघन केल्यास होईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:13 IST

Gondia : शिबिरांचे रेकॉर्ड ठेवावे लागणार

गोंदिया : रक्तदान हे पवित्र दान आहे. कोणत्याही आमिषाने रक्तदान करू नये, तशी अपेक्षा बाळगू नये, अशी कायद्यात अपेक्षा आहे. अनेकदा रक्तदान शिबिर आयोजक रक्तदात्यांना आकर्षित करण्यासाठी विविध भेटवस्तूंचे आमिष दाखवणारे पोस्टर लावतात. काही महिन्यांपूर्वीच राज्य रक्त संक्रमण परिषदेने सविस्तर पत्र काढून रक्तदान केंद्रांना कोणतेही आमिष रक्तदात्यांना देऊ नये, तसेच शिबिर आयोजकांनासुद्धा तशा सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न झाल्यास कारवाईचे आदेशही दिले आहेत.

'एसबीटीसी'चे निर्देश रक्तदान शिबिर आयोजकांनी रक्त्तदात्यांना कोणत्याही भेटवस्तू देऊ नये. रक्तदान हे स्वैच्छिक आहे. रक्तपेढींनी रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेकडून आम्ही अशा कोणत्याही भेटवस्तू देणार नाहीत, असे हमीपत्र घ्यावे. शिबिरात रक्तदानाबाबत जनजागृती करणारे साहित्य, टोपी, टी- शर्ट तसेच जेवणाचे कुपण देण्यास हरकत नाही.

शिबिरांचे रेकॉर्ड ठेवावे लागणार रक्तपेढींनी कोणत्या ठिकाणी शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये किती रक्तदान झाले, याची सविस्तर माहिती ठेवावी लागणार आहे. तसेच रक्त संक्रमण परिषदेकडून कधीही हे सर्व रेकॉर्डस् आता तपासण्यात येणार आहे.

प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार नवीन रक्तपेढी सुरू करताना तसेच आहेत त्या रक्तपेढ्यांचे नूतनीकरणाच्या वेळी त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यामध्ये त्यांना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार रक्तदान हे स्वैच्छिक, विनामोबदला आणि रक्तदात्याच्या स्वइच्छेनुसार आहे. कुठलाही मोबदला रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात देता येत नाही. राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या नियमांचे पालन करू, असे लिहून द्यावे लागणार आहे.

...तर रक्त घेणाराही कचाट्यात

  • कुठल्याही रक्तपेढीने नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नूतनीकरणावेळी त्याचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो. 
  • दिवाळी, निवडणुकीमुळे शिबिरे घटली होती. शिबिरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे काही दिवस रक्त मिळत नव्हते.

रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा सध्याच्या घडीला सात दिवस रक्त पुरेल एवढा साठा बँकांमध्ये आहे. आता रक्तदान शिबिरे पुन्हा सुरु झाल्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध होणार आहे

रक्तदान शिबिरांची गरज राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून आलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे रक्तपेढ्यांना पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे त्या नियमाप्रमाणेच रक्तदान शिबिरे आयोजित करणे अपेक्षित आहे. अपघातातील जखमींना रक्तपुरवठा करण्यासाठी तत्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाBlood Bankरक्तपेढी