शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

१११ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद पडली रेल्वे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : १९०८ मध्ये झाली होती रेल्वे सुरू

पुरूषोत्तम भागडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : व्यावसायिक दृष्ट्या देसाईगंज शहराचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी १९०८ मध्ये गोंदिया-नागभीड रेल्वेसेवा देसाईगंजवरून सुरूवात केली. तेव्हापासून रेल्वे अविरत सुरू होती. या रेल्वेला आता १११ वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत पहिल्यांदाच यावर्षी तब्बल २१ दिवसांपासून रेल्वेसेवा बंद आहे. पुढेही काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. मालवाहतूक व प्रवाशी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन गोंदिया-नागभीड नॅरोगेज रेल्वे सेवा १९०८ मध्ये देसाईगंजवरून सुरू केली. त्यानंतर १९१३ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली. १९९२ मध्ये गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. तत्कालीन चांदा जिल्ह्याचे कलेक्टर सी. सी. देसाई यांनी ही रेल्वेसेवा आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. जेव्हापासून रेल्वे सेवा सुरू झाली, तेव्हापासून अपवाद वगळता एकही दिवस रेल्वे सेवा थांबली नाही. देखभालीसाठी काही दिवस रेल्वे सेवा थांबविण्यात आली असेल. मात्र लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच प्रवाशी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

वर्दळ ओसरून पसरली शांतता
देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथूनच पुढचा रेल्वेचा प्रवास करतात. अगदी शहराला लागून असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्दळ राहत होती. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून प्रवाशी रेल्वेसेवा बंद केल्याने येथील वर्दळ ओसरून शांतता पसरली असल्याचे दिसून येते. अधूनमधून मालवाहू रेल्वे सुरू राहतात. मात्र प्रवाशी रेल्वे नसल्याने वर्दळ राहत नाही.

टॅग्स :railwayरेल्वे