शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत वाळू माफियांना मोठा दणका ! 'अवैध रेती उत्खनन आणि सहकार्याची गय केली जाणार नाही' ; तलाठी निलंबित

By संजय तिपाले | Updated: October 16, 2025 13:47 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : अंकिसा प्रकरणात कारवाई, निष्काळजीचा ठपका

गडचिरोली  : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा व परिसरात रेतीसाठ्याच्या नावाखाली अवैध साठेबाजी करुन वारेमाप उत्खनन व वाहतूक केल्याच्या प्रकरणात अखेर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.'लोकमत'ने हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात तलाठी व मंडळाधिकारी यांचे १५ ऑक्टोबर रोजी निलंबन करण्यात आले असून तहसीलदार नीलेश होनमोरे यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली.

सिरोंचा परिसरात वाळू माफियांचा सुळसुळाट सुरू असल्याचे समोर आले होते.  'लोकमत'ने हे प्रकरण लावून धरले. महसूल विभागाकडून नियंत्रण न ठेवण्यात आलेल्या निष्काळजीपणाच्या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. २ ऑक्टोबर रोजी मौजा मद्दीकुंठा आणि चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका तपासणीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला. या साठ्यासाठी २९ कोटी रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला असून दोन जेसीबी, एक पोकलेन मशीन आणि पाच ट्रक अवैध उत्खननासाठी वापरले जात असल्याचेही उघड झाले. चौकशीत महसूल अधिकाऱ्यांची बेपर्वाई ठळकपणे दिसून आली.

तलाठी  अश्विनी सडमेक,यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीघाटांची पाहणी न करता नियमबाह्य उत्खननाकडे दुर्लक्ष केले, तर मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे यांनी नोंदवही आणि तपासणी अहवाल अद्ययावत ठेवला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार व योगाजी कुडवे यांनी दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

विभागीय आयुक्तांना कारवाईचा अहवाल

दरम्यान, तहसीलदार नीलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावरील निष्काळजीपणा व नियंत्रणशून्यता यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांची बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. कारवाईचा अहवाल देखील सादर केला आहे.

कठोर भूमिकेने हादरले प्रशासन

या प्रकरणात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कठोर भूमिका घेतली. अवैध रेती उत्खननाला कोणतीही गय केली जाणार नाही, जबाबदारी टाळणाऱ्यांवर थेट कारवाई होईल, असा इशाराच जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे गैरव्यवहार करणारे अधिकारी , कर्मचाऱ्यांना जबर हादरा बसला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Crackdown on Sand Mafia in Gadchiroli; Official Suspended!

Web Summary : Gadchiroli authorities cracked down on illegal sand mining, suspending a revenue officer. An investigation revealed massive illegal stockpiles, leading to proposed fines and machinery seizures. Negligence prompted disciplinary action; more officials face scrutiny.
टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाsandवाळूsuspensionनिलंबनGadchiroliगडचिरोलीGovernmentसरकार