शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील स्क्रॅप उचलण्याच्या कारणावरून ५० हजारांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:27 IST

जर तुला ठेका पाहिजे असेल तर महिना ५० हजार आम्हाला द्यावे लागतील अन्यथा तुला जीवे मारले जाईल, अशी धमकी दिली.

ठळक मुद्देपोंधवडी गावच्या माजी सरपंचासह ६ जणांविरोधात खंडणीसह इतर गुन्ह्याची नोंद

भिगवण : बिल्ट कंपनीतील स्क्रॅप उचलण्याच्या कारणावरून बेकायदा जमाव जमवून ५० हजार रुपयाची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोंधवडी गावच्या माजी सरपंचासह ६ जणांविरोधात खंडणीसह इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती भिगवण पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोंधवडी गावच्या हद्दीत असणाऱ्या बिल्ट कागद कंपनीत शिरवळच्या कॉन्ट्रॅक्टरने स्क्रॅप उचलण्याचे ठेका घेतला आहे.तर पोंधवडी गावचे गणेश दत्तात्रय पवार यांनी सबंधित ठेकेदाराकडून करार करत काम सुरु करण्याच्या उद्देशाने दोन गाड्या तसेच काही मजुरांना सोबत घेत कंपनीमध्ये प्रवेश करण्याच्या वेळी पोंधवडी गावचे माजी सरपंच नाना अर्जुन बंडगर ,नवनाथ उर्फ बिट्टू अर्जुन बंडगर ,निलेश दतात्रय बंडगर ,रामभाऊ तात्या बंडगर ,बापू हनुमंत करे ,आप्पा सवाणे यांनी गाड्या अडवून शिवीगाळ करीत स्क्रॅप उचलण्यास विरोध केला.यावेळी गणेश पवार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत 'तू , जर हा ठेका सोडला नाहीतर आमचे महिन्याला ५० हजार रुपयाचे नुकसान होणार आहे.त्यामुळे जर तुला ठेका पाहिजे असेल तर महिना ५० हजार आम्हाला द्यावे लागतील अन्यथा तुला जीवे मारले जाईल, अशी धमकी दिली.यावेळी संबंधितांनी पवार यांनी आणलेल्या लेबरला शिवीगाळ करीत आणि धक्काबुक्की करीत मारण्याची धमकी देत घाबरविण्याचा प्रयत्न केला.तसेच स्क्रॅप वाहतुकीसाठी आणलेली वाहनाची चाव्या हिसकावून घेत वाहने बळजबरीने ताब्यात घेत दुसऱ्या ठिकाणी नेली.त्यामुळे गणेश पवार यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत पोंधवडी गावच्या माजी सरपंचासह ६ जनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चौकट 
शिक्रापूर शिरूर आणि चाकण या एम.आय .डी.सी.भागातील कारखानदारीत पेटत असलेला स्क्रॅपचा ठेका आता पोंधवडी सारख्या ग्रामीण भागातही चर्चेत येत असल्यामुळे स्क्रॅपखाली नक्की दडलय काय असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात कुतूहल जागे करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी ओद्योगिक परिसरात होणारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत कंपनीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे राहिलेले असतात त्यामुळे काहींच्या स्वाथार्साठी याला गालबोट लागू दिले जाणार नाही .तसेच ओद्योगिक परिसरात शांतता हाच पोलिसांचा अजेंडा असून वातावरण बिघाडविण्याचा प्रयत्न करणारा विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :BhigwanभिगवणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस