कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:14 IST2026-05-05T15:13:17+5:302026-05-05T15:14:08+5:30

ज्या तरुणाला पोटच्या मुलाप्रमाणे मानले, त्यानेच पैशांच्या हाव्यासपोटी एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या केली.

The climax has been reached! The one he considered his own son, he ended it; Brutal murder of the wife of a retired police sub-inspector | कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या

AI Generated Image

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या तरुणाला पोटच्या मुलाप्रमाणे मानले, त्यानेच पैशांच्या हाव्यासपोटी एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. शारदा यादव (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वासार्हतेचा फायदा घेत आरोपीने रचलेला हा खुनाचा कट एखाद्या चित्रपटातील कथेसारखा भयानक आहे.

मुलासारखाच घरात वावर, पण मनात मात्र पाप!

सुभाषनगरच्या मढीनाथ परिसरात राहणारे गजराज सिंह हे 'एलआययू'मधून दरोगा पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या घरात बिहारीपूरचा रहिवासी वरुण पारासरी याचे सतत येणे-जाणे होते. शारदा यादव यांनी वरुणवर इतका विश्वास टाकला होता की, त्या त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत असत. मात्र, हाच मानलेला मुलगा शारदा यांच्या जीवावर उठेल, याची पुसटशी कल्पनाही या कुटुंबाला नव्हती.

काय घडलं त्या दिवशी?

शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास शारदा यादव दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन बँक लॉकरमध्ये ठेवण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याच नाहीत. घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक दृश्य दिसले. सकाळी ११:५८ वाजता शारदा यादव या वरुणच्या कारमध्ये बसताना दिसल्या. इथूनच पोलिसांच्या संशयाची सुई वरुणकडे वळली.

६ तोळे सोनं आणि रक्ताने माखलेला पाना

पोलिसांनी वरुणला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने शारदा यादव यांना बहकावून कारमध्ये बसवले आणि पीलीभीतच्या दिशेने नेले. वाटेत गाडीतील जड अवजाराने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह जहानाबाद परिसरात फेकून दिला. शारदा यादव यांच्या अंगावर असलेले ६ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या उद्देशानेच हे हत्याकांड केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी कार केली जप्त

आरोपी वरुणच्या कारमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार सापडले आहे. वरुण हा नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, "आम्ही ज्याला आधार दिला, त्यानेच आमचं घर उद्ध्वस्त केलं," अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

Web Title : बेटे जैसा माना, शख्स ने सोने के लिए रिटायर्ड पुलिसकर्मी की पत्नी को मारा

Web Summary : उत्तर प्रदेश में एक व्यक्ति ने सेवानिवृत्त पुलिस अधिकारी की पत्नी शारदा यादव की हत्या कर दी, जिसे वह माँ मानता था। उसने गहनों के लिए उसे अपनी कार में बहलाया, उसकी हत्या कर दी और छह तोला सोना चुराने के लिए शव को फेंक दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर कार और हथियार जब्त कर लिए।

Web Title : Trusted Like a Son, Man Kills Retired Cop's Wife for Gold

Web Summary : In Uttar Pradesh, a man murdered a retired police officer's wife, Sharada Yadav, whom he treated like a mother, for her jewelry. He lured her into his car, killed her, and dumped the body to steal six tolas of gold. Police arrested the suspect and seized the car and weapon.