जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:38 PM2020-07-03T20:38:01+5:302020-07-03T20:40:33+5:30

खून प्रकरणी एकाला अटक इतर फरार

One person was killed and two others were seriously injured in the attack | जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ मद्रासी पाड्यात राहणारे विल्सन जाधव, स्वप्नील वाघ, अविनाश नायडू यांचे परिसरातील राहुल वाल्मिकिसह मित्रासोबत भांडण होते.याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर जण फरार झाले.

उल्हासनगर - जुन्या रागातून झालेल्या खुनी हल्लात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले. गुरवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर जण फरार झाले.

उल्हासनगर कॅम्प नं-४ मद्रासी पाड्यात राहणारे विल्सन जाधव, स्वप्नील वाघ, अविनाश नायडू यांचे परिसरातील राहुल वाल्मिकिसह मित्रासोबत भांडण होते. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गुरवारी रात्री साडे बारा वाजता दोन्ही टोळी एकमेकांसमोर आल्याने जुन्या रागातून धारदार शस्त्राने हल्ला झाला. यामध्ये विल्सन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्नील वाघ व अविनाश नायडू जखमी झाले. विठ्ठलवाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्त्तर तपासणी साठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. तर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. चौकशीचे चक्रे पोलिसांनी जलद फिरवुन संशयित राहुल वाल्मिकि याला अटक केली. तर त्याचे इतर साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले.विठ्ठलवाडी पोलिस अधिक तपास करीत असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी इतरांना लवकरात लवकर गजाआड करण्याचे संकेत दिले. खून प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

Web Title: One person was killed and two others were seriously injured in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.