Odisha Crime: ओडिशाच्या नवरंगपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह घराच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. मात्र, या थरारक हत्याकांडाचा खुलासा आरोपीच्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्या मुलाने केला आहे.
नवरंगपूर जिल्ह्यातील रायघर इथल्या बोरगाव गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष गंड हा पत्नी मनई गंड आणि मुलांसह शनिवारी एका विवाह सोहळ्यासाठी गेला होता. लग्नावरून घरी परतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, नशेत असलेल्या सुभाषने पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयाचे भूत डोक्यात गेलेल्या सुभाषने पत्नीला इतकी मारहाण केली की, तिचा जागीच मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट
पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपीने घाबरून गुन्हा लपवण्याचा कट रचला. त्याने त्याच रात्री छुप्या पद्धतीने पत्नीचा मृतदेह घराच्या अंगणात असलेल्या सेप्टिक टँकमध्ये टाकला आणि तो वरून बंद केला. कोणालाही संशय येऊ नये, याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती.
मम्मी सेप्टिक टँकमध्ये आहे; चिमुरड्याच्या एका वाक्याने गुपित फुटले
या सगळ्या भयानक घटनेचा प्रत्यक्षदर्शी त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता. वडिलांनी आईला मारल्याचे आणि तिला कुठे लपवले, हे त्या चिमुरड्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. या घटनेचा मुलाच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्याने धीर एकवटून शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना मम्मी सेप्टिक टँकमध्ये आहे असे सांगितले.
सुरुवातीला मुलाचे बोलणे गांभीर्याने घेतले गेले नाही, मात्र तो पुन्हा पुन्हा तेच सांगू लागल्याने गावकऱ्यांचा संशय बळावला. त्यांनी सुभाषला पकडून याबाबत विचारलं. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांच्या दबावापुढे त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलीस कारवाई आणि पुढील तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सेप्टिक टँक उघडून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी आरोपी सुभाष गंडला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता.
Web Summary : In Odisha, a man murdered his wife, suspecting infidelity, and hid her body in a septic tank. The crime was revealed when their four-year-old son told neighbors his mother was in the tank. Police arrested the husband.
Web Summary : ओडिशा में, एक व्यक्ति ने अपनी पत्नी पर बेवफाई का शक होने पर उसकी हत्या कर दी और उसके शव को सेप्टिक टैंक में छिपा दिया। अपराध का खुलासा तब हुआ जब उनके चार साल के बेटे ने पड़ोसियों को बताया कि उसकी माँ टैंक में है। पुलिस ने पति को गिरफ्तार कर लिया।