शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

युवराज सिंगविरोधात तक्रार दाखल न करून घेणं 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना भोवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 19:52 IST

Yuvraj Singh : अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात येणार आहे आहे. हिस्सार विशेष न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देहिस्सार विशेष न्यायालयामध्ये तक्रारदार आणि वकील रजत कलसन यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी हा आदेश देण्यात आला.

क्रिकेटपटू युवराज सिंगने दलित समाजाबाबत गेल्या वर्षी अपमानजनक टिप्पणी केली होती. या प्रकरणात युवराजविरोधात खटला दाखल न करणाऱ्या हरियाणातील तीन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याअंतर्गत ही चौकशी करण्यात येणार आहे आहे. हिस्सार विशेष न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

हिस्सार विशेष न्यायालयामध्ये तक्रारदार आणि वकील रजत कलसन यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी हा आदेश देण्यात आला. या प्रकरणी गुंतलेले तपास अधिकारी विनोद शंकर, रोहताग सिहाग आणि जसवीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नॅशनल अलायन्स आणि दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

काय आहे प्रकरण ?

१ जून २०२० रोजी युवराज सिंह एका लाईव्ह कार्यक्रमात रोहित शर्मासोबत सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यानं युजवेंद्र चहलबद्दल अपमानजक भाषा वापरली होती. युवराजचं ते वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. त्यानंतर युवराजने त्याबाबत माफी मागितली होती. मात्र, २ जून रोजी हरियाणातील हांसी पोलीस ठाण्यात युवराजच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकारच्या तक्रारीनंतर खटला दाखल झाल्यानंतर चौकशी करावी लागते. युवराजच्या प्रकरणात पोलिसांनी खटला दाखल न करता प्राथमिक तपास सुरु केला, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

या प्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं हांसीच्या पोलीस अधिक्षकांना खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी खटला दाखल केला नाही. त्यानंतर हरियणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील पोलीस विभागाने या आदेशाकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हिस्सारच्या पोलीस अधिकाऱ्यांना २ मार्च रोजी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Yuvraj Singhयुवराज सिंगPoliceपोलिसSC STअनुसूचित जाती जमातीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयChief Ministerमुख्यमंत्री