शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:48 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील इटावा येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका भाचीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी मामीचे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरले. त्यानंतर हे दागिने तिने तिच्या प्रियकराकडे सोपवले.

उत्तर प्रदेशमधील इटावा येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका भाचीने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी मामीचे सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने चोरले. त्यानंतर हे दागिने तिने तिच्या प्रियकराकडे सोपवले. हे प्रकरण समोर आलं तेव्हा तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी या पूर्ण प्रकरणाचा उलगडा करताना भाची आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हे दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळण्याच्या तयारीत होते.

हे संपूर्ण प्रकरण बकेवर क्षेत्रातील इंद्राऊखी गावातील आहे. येथे राहणाऱ्या कामिनी नावाच्या महिलेने तिच्या घरात ठेवलेले दागिने अचानक गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. या दागिन्यांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.  तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान, तपासामधून ही चोरी घरातीलच कुणीतरी व्यक्तीने केल्याचा अंदाज पोलिसांना आला.

त्यानंतर तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने कामिनीची भाची आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, या दोघांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, सदर भाची गेल्या काही काळापासून मामा-मामीच्या घरी राहत होती. तसेच मामीने तिचे दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला माहिती होती.  कुटुंबीयांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिने संधी साधून हे सारे दागिने लांबवले आणि ते तिचा प्रियकर असलेल्या योगेश याला दिले.

२२ वर्षीय योगेशने लग्नाचं आमिष दाखवून वारंवार दागिने मागवले होते. तसेच सर्व दागिने हाती आले. तेव्हा लग्न करण्यासाठी पळण्याची तयारी त्यांनी केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते पकडले गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Niece steals jewelry for boyfriend, arrested in Uttar Pradesh.

Web Summary : In Uttar Pradesh, a niece stole ₹30 lakh worth of jewelry from her aunt to marry her boyfriend. Police arrested them both as they prepared to elope. The niece, living with her aunt, knew where the jewelry was kept and exploited the family's trust.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी