शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 11:16 AM

Murder by strangulation of wife रागाच्या भरात गणेश पहारे याने नर्मदा (३७) हिचा गळा आवळून खून केला.

ठळक मुद्देगणेश पहारे हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.३ मार्च रोजी रात्री उभयतांमध्ये पुन्हा वाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथील गणेश भिकाजी पहारे याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून गेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी गणेश भिकाजी पहारे यास अटक करण्यात आली आहे.शेलगाव देशमुख येथील गणेश पहारे याचे नर्मदाबाई हिच्याशी २००२ मध्ये लग्न झाले  होते. या दाम्पत्याला एकूण पाच अपत्ये आहेत. मात्र गणेश पहारे हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. त्यातून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दरम्यान, ३ मार्च रोजी रात्री उभयतांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात गणेश पहारे याने नर्मदा (३७) हिचा गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मृत नर्मदाचा भाऊ रवी सुखेदव सिमरे (रा. मालेगाव, जि. वाशिम) यास मिळाली. त्यावरून त्याने डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार व वैद्यकीय अधिकारी यांचा शवविच्छेदन अहवाल याचा आधार घेत आरोपी गणेश पहारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी