शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:03 PM

या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भादंवि कलम ३१७ अन्व्ये याबाबत गुन्हा दाखल नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तात्या सवांजी हे या बाळाला सोडून जाणाऱ्या आईचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने कोंबळवाडी विमल पार्क या चाळीतील रहिवाश्यांनी कोणाचे बाळ रडते याचा शोध घेतला.हे दृश्य पाहताच येथील आशा रुके या महिलेने तात्काळ घरातील कापड आणून त्या बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या व रक्त पुसून काढले.

मातृत्वाला काळिमा फासणारी घटना, एक दिवसाच्या मुलाला दिले टाकूनकांता हाबळे नेरळ - कोरोना विषाणूमुळे महामारीचा काळ सुरु आहे. मात्र या काळात माणुसकीचे दर्शन सगळीकडे दिसून आले. असे असताना स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला थोड्याच वेळात टाकून देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याची घटना नेरळ येथे घडली आहे. तर या मुलाला स्वच्छ पुसून पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करत निस्वार्थ ममत्व त्याच गावातील आशा रुके यांनी दाखवून दिले आहे. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत.       

                                                             

मूल नाही म्हणून मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, बाबा, फकीर, डॉक्टर असे कोणते उपाय नाहीत जे एखाद दाम्पत्य करत नाही. बाळासाठी नेक अनेक प्रयत्न त्यांचे सुरु असतात.  त्यामागे कारण फक्त एकच आपलं बाळ असावं. अशी अनेक दाम्पत्य आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आणि त्यांची बाळासाठीची धडपड पाहून आपले हृदय हि त्यांच्यासाठी पिळवटून निघते. मात्र कर्जत तालुक्यात या उलट एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने मातृत्वाला काळिमा फासला गेला हे मात्र नक्की. दिनांक ०३ जुलैच्या पहाटे आपल्या पोटी जन्म घेतलेल्या बाळाला काही तासातच आईने अंधारात नेरळ कोंबळवाडी येथे तसेच सोडून दिले होते. शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने कोंबळवाडी विमल पार्क या चाळीतील रहिवाश्यांनी कोणाचे बाळ रडते याचा शोध घेतला. मात्र, आवाज चाळीच्या मागून येत असल्याने त्यांनी तिथे जाऊन पहिले तर चाळीच्या मागे खड्यात अंगावर एकही कपडा नाही, सोबत नाळ, अंगाला लागलेले रक्त, अशा स्थितीत काहीच वेळापूर्वी जन्मलेले एक बाळ आढळून आले. त्या बाळाच्या अंगावर मुंग्या चढून त्या त्याचा चावा घेत होत्या त्या वेदनेने ते बाळ कण्हत होते. हे दृश्य पाहताच येथील आशा रुके या महिलेने तात्काळ घरातील कापड आणून त्या बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या व रक्त पुसून काढले. तसेच नेरळ पोलिसाना या घटनेची माहिती देऊन पोलिसांच्या मदतीने त्या बाळाला डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

 

या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भादंवि कलम ३१७ अन्व्ये याबाबत गुन्हा दाखल नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तात्या सवांजी हे या बाळाला सोडून जाणाऱ्या आईचा शोध घेत आहेत. दरम्यान या बाळाला आपण सांभाळू अशी भूमिका आशा रुके व त्यांचे पती विनोद रुके यांनी घेतली आहे. त्यासाठी शासकीय नियमात आपण त्या बाळाला दत्तक घेऊन त्याचे संगोपन करू असे देखील रुके दाम्पत्याने सांगितले आहे. 

त्या बाळाला आपण हातात घेताच त्या विषयी माझे ममत्व जागे झाले मला त्याचा लळा लागला आहे. गेले अनेक वर्षे आम्हाला मूल बाळ नाही. त्यासाठी अनेक दरवाजे आम्ही ठोठावले मात्र १० वर्षात आम्हाला मुलाचे सुख मिळाले नाही. या बाळाच्या रूपात आम्हाला आमचे भविष्य दिसत आहे. देवाने आम्हाला सर्व सुख दिले मात्र मुलाचे सुख मिळाले नाही तेव्हा या साठी शासकीय सर्व सोपस्कार पार पडण्याची आमची तयारी आहे पण ते बाळ आम्हाला मिळाले पाहिजे. - आशा विनोद रुके रहिवाशी,

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगड