३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रत्यक्षदर्शी, शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, सांगितलं 'ते' सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:37 IST2026-02-05T18:36:21+5:302026-02-05T18:37:11+5:30
सोसायटीतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; प्रत्यक्षदर्शी, शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, सांगितलं 'ते' सत्य
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून तीन बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघींना 'कोरियन गेम्स'चं व्यसन जडलं होतं, कोरियन कल्चरच्या त्या प्रेमात होत्या आणि याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
आता या प्रकरणात सोसायटीतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, "कदाचित एक मुलगी उडी मारण्याचा प्रयत्न करत होती आणि बाकीच्या दोघी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात खाली पडल्या असाव्यात." शेजारी राहणाऱ्या महिलांनी सांगितलं की, हे कुटुंब दोन वर्षांपूर्वीच या सोसायटीत राहायला आलं होतं, पण त्यांचे कोणाशीही संबंध नव्हते.
"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा
एका महिलेने माहिती दिली की, त्यांच्या घरातून अनेकदा ओरडण्याचे आणि भांडणाचे आवाज येत असत. तर दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, सुरुवातीला 'कोरियन गेम'बाबत कोणतीही चर्चा नव्हती, मग अचानक हे कारण समोर कसं आलं, हे समजत नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहिणींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?
ना गेम, ना टास्क... ३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा 'तो' दावा खोटा? पोलिसांना वेगळाच संशय
लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, "पालक त्यांना वाय-फाय आणि महागडे मोबाईल घेऊन देत होते, पण गेल्या दोन वर्षांपासून या मुली शाळेत जात नव्हत्या. जर काही आर्थिक अडचण असती, तर सरकारी शाळांचे पर्याय उपलब्ध होते. अशा महागड्या सोसायटीत राहताना आर्थिक टंचाईचे कारण पटण्यासारखे नाही." या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला
जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे. सुरुवातीच्या चौकशीत पालकांनी सांगितलं होतं की, एका कोरियन गेमच्या व्यसनामुळे मुलींनी शाळा सोडली होती आणि त्या कोणाशीही बोलत नव्हत्या. तसेच टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. मात्र आता शेजाऱ्यांनी दिलेली माहिती पाहता या प्रकरणामागे काही वेगळंच कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.