"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:52 IST2026-02-04T18:51:37+5:302026-02-04T18:52:57+5:30

पोलीस तपासात एक खळबळजनक नोट सापडली असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.

ghaziabad three minor sisters end life online gaming korean culture | "तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन बहिणींनी टोकाचं पाऊल उचलत इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस तपासात एक खळबळजनक सुसाईड नोट सापडली असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलींनी सुसाईड नोटमध्ये आपल्या कोरियन कल्चरबद्दलच्या आकर्षणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं की, "आमचं कोरियन कल्चरवर खूप प्रेम आहे आणि आम्हाला त्यापासून दूर केलं जात आहे. तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून तोडण्याचा प्रयत्न केला, आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही त्यावर किती प्रेम करतो."

ना गेम, ना टास्क... ३ बहिणींच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा 'तो' दावा खोटा? पोलिसांना वेगळाच संशय

मुलींच्या एका डायरीमध्ये कोरियन कल्चरसोबतच K-POP, कोरियन म्युझिक, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि सिरीजचा वारंवार उल्लेख आहे. एका ठिकाणी इंग्रजीत “WE LOVE KOREAN CULTURE” असंही लिहिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ही केवळ आवड नव्हती तर तिचं रूपांतर एका व्यसनात झालं होतं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला

जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य

तपासात असं समोर आलं आहे की, तिन्ही बहिणी कोरियन गाणी, चित्रपट, कार्टून, गेम्स आणि युट्युबर्सने प्रचंड प्रभावित होत्या. प्राथमिक तपासात ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार कोणताही 'टास्क बेस्ड' घातक गेम समोर आलेला नाही. त्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेले सामान्य गेम्स खेळत होत्या. घटनेच्या वेळी घरात वडील, त्यांच्या दोन पत्नी, ५ मुलं उपस्थित होते. सध्या गाझियाबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या सामूहिक आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title : बहनों के सुसाइड नोट में कोरियाई संस्कृति का जुनून, पारिवारिक कलह।

Web Summary : गाजियाबाद में तीन बहनों ने कोरियाई संस्कृति के प्रति अपने प्यार और उससे अलग होने के कारण आत्महत्या कर ली। एक सुसाइड नोट से के-पॉप, फिल्मों और गेम्स के प्रति उनका गहरा आकर्षण सामने आया, जिससे पता चलता है कि यह एक लत बन गई थी। पुलिस मामले की आगे जांच कर रही है।

Web Title : Sisters' suicide note reveals Korean culture obsession, family conflict.

Web Summary : Three sisters in Ghaziabad committed suicide, citing their love for Korean culture and feeling disconnected from it. A suicide note revealed their deep fascination with K-pop, movies, and games, suggesting it became an addiction. Police are investigating the case further.