शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याला विरोध केल्याने हल्लेखोरांनी तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 15:36 IST

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या पटेल नगर भागात एका व्यक्तीचा निर्घृणपणे खून झाला आहे. कामावरुन घरी परतत असलेल्या एका इलेक्ट्रीशियनला दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रतिकार केल्यावर भोसकून हत्या केली. पोलिसांच्या हाती घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, ज्यात आरोपी गुन्ह्यानंतर पळून जाताना दिसत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 42 वर्षीय मनोज कुमार कुटुंबासह फरीदपुरी, पश्चिम पटेल नगर येथे राहायचे. शुक्रवारी संध्याकाळी ते बलजीत नगर येथून काम करुन घरी परतत असताना 3 मुलांनी त्यांना लुटण्याच्या उद्देशाने अडवले. पण, मनोजने याचा विरोध केल्यामुळे आरोपींनी मनोजला अनेकवेळा चाकू भोसकला, ज्यात मनोजचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पळून जाताना दिसत आहेत. पोलिसांना मनोजचे वॉलेट, फोन आणि सोन्याची अंगठी गायब असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा दावा आहे की त्यांना आरोपींविषयी अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस