शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:16 IST

Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 9mm कॅलिबरची तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये दोन जिवंत काडतुसं आणि एका रिकाम्या बॉक्सचा समावेश आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांची आणखी वेगाने तपास करत आहेत.

9mm कॅलिबर काडतुसं नागरी वापरासाठी प्रतिबंधित आहेत. याचाच अर्थ कोणताही नागरिक त्यांच्या कायदेशीर परवाना असलेल्या बंदुकीमध्ये ही काडतुसं वापरू शकत नाही. ही काडतुसं सामान्यतः सुरक्षा दल, पोलीस किंवा विशेष परवानगी असलेल्यांकडे असतात. यामुळे ही काडतुसं इतक्या संवेदनशील ठिकाणी कशी पोहोचली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम

काडतुसं सापडली, पण शस्त्र गायब

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळावरून कोणतेही पिस्तूल किंवा शस्त्रांचे भाग जप्त करण्यात आले नाहीत. काडतुसं सापडली असली तरी गोळीबार करण्यासाठी वापरलेलं शस्त्र गायब आहे. यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा झाला आहे, कारण ही काडतुसं स्फोटापूर्वीपासूनच तिथे होते की नंतर टाकण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा

"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

कर्मचाऱ्यांच्या शस्त्रांची तपासणी

पोलीस सूत्रांनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रं आणि काडतुसं देखील तपासण्यात आली. तपासात असं दिसून आलं की कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून काडतुसं गहाळ झालेली नाहीत. यामुळे ही काडतुसं बाहेरील व्यक्तीची असावीत असा संशय आणखी वाढला आहे.

व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात

 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती

दिल्ली पोलीस आता 9mm  कॅलिबरची काडतुसं घटनास्थळी कशी आली याचा तपास करत आहेत. कार स्फोट आणि या काडतुसं यांच्यात थेट संबंध आहे का किंवा हा केवळ योगायोग आहे का याचाही तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम ही काडतुसं अलीकडेच वापरली गेली आहेत का याचा देखील तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: 9mm Cartridges Found, Weapon Missing; Investigation Intensifies

Web Summary : Delhi blast investigation reveals 9mm cartridges at the scene, restricted for civilian use. Surprisingly, the weapon is missing, deepening the mystery. Police are investigating how the cartridges arrived and checking staff weapons to find any connections, exploring all possibilities.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcarकारPoliceपोलिसTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला