शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात पडलेल्या बैलाला वाचवायला गेला; खात्यातूनच 1 लाख रुपये उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 09:19 IST

एका बैल मोकळ्या जागेवर खणलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याला वाचविण्यासाठी खटाटोप केले.

ठळक मुद्देबैलाला वाचविण्यासाठी त्यांनी त्यांची माहिती आणि 10 रुपये ऑनलाईन मोबाईलवरूनच भरले. पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल 22 दिवस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या.

संकटकाळात अडचणीत असताना इंटरनेटवरून फोन नंबर मिळवून मदत मागितली जाते. मात्र, असे करणे धोक्याचे बनले आहे. याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडले आहे. काही दिवसांपूर्वी एक बैल खणलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याला सोडविण्यासाठी एकाने इंटरनेटवरून रेस्क्यू टीमला फोन केला. मात्र, नंतर त्याला आलेल्या मॅसेजने झोपच उडविली. 


वकील पुष्पेंद्र सिंह यांनी एका बैलाला मोकळ्या जागेवर खणलेल्या खड्ड्यात अडकल्याचे पाहिले. यामुळे त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला. तेथे त्यांना एक नंबर मिळाला. त्यावर फोन केला असता त्यांना मदत देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि 10 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल असे सांगितले. 

बैलाला वाचविण्यासाठी त्यांनी त्यांची माहिती आणि 10 रुपये ऑनलाईन मोबाईलवरूनच भरले. यावेळी त्यांनी तातडीने नगरपालिकेची गाडी येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी गाडी आलीच नाही. उलट त्यांच्या खात्यातून चारवेळा पैसे कापल्याचा मॅसेज आला. एकूण 1 लाख 2 हजार रुपये कापण्यात आले. 


पुष्पेंद्र यांचा आरोप आहे की, ही घटना 31 डिसेंबरला घडली. मात्र, पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल 22 दिवस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. यानंतर शेवटी 22 जानेवारीला एसएसपींकडे दाद मागितल्यावर तक्रार दाखल करून घेण्यात आली. पोलिसांनी सांगितले की,  प्राथमिक तपासात असे दिसत आहे की आरोपींनी त्यांना ऑनलाईन लिंक पाठवून मोबाईल फोन हॅक केला आणि त्यांची माहिती चोरून पैसे चोरले. 
 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश