शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
2
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
3
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
4
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
5
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
6
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
7
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
8
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
9
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
10
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
11
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
12
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
13
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
14
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
15
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
16
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
17
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
18
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
19
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
20
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:10 IST

लग्नानंतर अवघ्या १६ दिवसांनी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील ७२ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरी गायब झाली.

लग्नानंतर अवघ्या १६ दिवसांनी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील ७२ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरी गायब झाली. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये ही घटना घडली. लोमा गावातील रहिवासी असलेल्या धर्मेंद्रचं लग्न २५ एप्रिल रोजी पियर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीशी झालं होतं. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण १६ व्या दिवशी जेव्हा संपूर्ण कुटुंब झोपलं होतं, तेव्हाच नवरी घरात ठेवलेले ७२ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झाली.

सकाळी जेव्हा धर्मेंद्रला जाग आली तेव्हा त्याची पत्नी बेडवर नव्हती. सुरुवातीला त्याला वाटलं की ती घराच्याच कुठल्यातरी भागात असेल. पण शोध सुरू झाला तेव्हा प्रकरण काही वेगळंच निघालं. कुटुंबीयांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली, पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. जेव्हा घरातील पेट्या आणि कपाटांची तपासणी केली, तेव्हा रोख रक्कम आणि दागिने गायब असल्याचं आढळून आलं.

नवरदेवाच्या कुटुंबाने केला आरोप

नवरी एकटी पळून गेली नसून सर्व काही प्लॅनिंग असल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. लग्न हे केवळ एक निमित्त होतं आणि घरातील ऐवज घेऊन पळून जाणं हाच मुख्य हेतू होता, असा आरोप नवरदेवाच्या कुटुंबाने केला आहे. धर्मेंद्रने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पत्नी अचानक घरातून गायब झाल्याचं म्हटलं आहे.

नवरीच्या कुटुंबाचा पलटवार

नवरीच्या कुटुंबीयांनी यावर पलटवार केला आहे. त्यांची मुलगी स्वतःच्या इच्छेने गेलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. उलट सासरच्या लोकांनीच तिला गायब केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. म्हणजेच, एकीकडे नवरा म्हणतोय की नवरी दागिने घेऊन पळून गेली, तर दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय म्हणतायत की आमच्या मुलीला गायब करण्यात आलं आहे.

पोलीस तपास सुरू

गायघाटचे पोलीस ठाणे प्रभारी राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी जोडलेलं असल्याचं वाटत आहे. सध्या पोलीस नवरीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bride Flees with Valuables 16 Days After Marriage: Shocking Incident

Web Summary : A bride in Bihar fled with ₹72,000 and jewelry just 16 days after her wedding. The groom's family alleges pre-planning, while the bride's family claims she was abducted. Police are investigating the conflicting claims and searching for the bride, suspecting a love affair.
टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नMONEYपैसाGoldसोनंPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी