1 / 5लुपस म्हणजे काय? : एसएलई (सिस्टेमिक ल्युपस एरिथेमेटोसस) म्हणजे लुपस हा स्वयंप्रतिकार (Autoimmune) विकार असून, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्या अवयवांवर हल्ला करू लागते, तेव्हा हा आजार निर्माण होतो, या विकाराचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होऊ शकतो. हा आजार विशेषतः महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. दहा रुग्णांपैकी जवळपास नऊ रुग्ण महिला असतात. शिवाय, प्रजननक्षम वयोगटातील महिलांबरोचरच तरुण मुलीनाही हा विकार होण्याची शक्यता असते.2 / 5लक्षणे ओळखा : लुथसची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटू शकतात. त्यामुळे ती ओळखणे कठीण जाते. सांधे दुखणे, सूज येणे, अकडणे, वारंवार ताप येणे ही सामान्य लक्षणे आहेत, चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचा लाल चट्टा दिसणे, ज्याला 'बटरफ्लाय रॅश' म्हणतात, हे या विकाराचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. याशिवाय केस गळणे, टक्कल पडणे, हातांच्या बोटांचा रंग बदलणे- कधी निळा तर कधी काळा पडणे- अशी लक्षणेही आढळतात,3 / 5महिलांवर अधिक परिणाम : लुपस विकाराचा महिलांच्या आरोग्यावर विशेषतः गंभीर परिणाम होऊ शकतो. जसे की, महिला वर्गात या विकाराचे प्रमाण अधिक आहे. या विकारामुळे अनेकदा गर्भधारणेस अडथळे निर्माण होणे, वारंवार गर्भपात होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.4 / 5उपचारांनी विकार नियंत्रणात : आधुनिक वैद्यकीय शास्त्रात या विकारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ऱ्हुमॅटोलॉजिस्ट (Rheumatologist) असे म्हणतात. वेळेत घेतलेल्या योग्य औषधोपचारांनी विकार नियंत्रणात राहतो. मात्र, आपल्याकडे लक्षणे दिसूनही डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो. त्यामुळे आजार अधिक गंभीर होण्याचा धोका वाढतो. या विलंबामुळे शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तज्ज डुमॅटोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास रुग्ण सामान्य व निरोगी जीवन जगू शकतात.5 / 5अन्य अवयवांवर होणारा परिणाम : लुपसचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होऊ शकतो. हृदय किवा फुप्फुसांवर परिणाम झाल्यास धाप लागणे, स्वास घेण्यास त्रास होणे किवा छातीत वेदना होणे, अशी लक्षणे दिसतात. मूत्रपिंडावर परिणाम झाल्यास लघवीद्वारे प्रोटीनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे किडनीचे कार्य बिघडू शकते, मेंदूवर परिणाम झाल्यास डोकेदुखी, फिट येणे, पक्षाघात किंवा मानसिक समस्या उद्भवू शकतात. तसेच रक्तातील घटकांचे प्रमाण कमी होणे किवा रक्त पटकन गोठणे, ही लक्षणेही दिसतात.