कल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या कचरा गोळा करणारा कंत्राटदाराच्या गाडीखाली सापडून एका २ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाचे नाव शिवम राठोड असे आहे. मुलाच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील लाड या कचरा गाडी चालकास अटक केली आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
महापालिकेने कचरा गोळा करण्याचे काम सुमित एल्को प्लास्ट या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून कचरा गोळा करणाऱ्या गाडया विविध प्रभागात फिरून कचरा गोळा करण्याचे काम करतात. वसार गावात दोन वर्षाचा मुलगा शिवम राठोड हा खेळत होता. त्याठिकाणाहून कचरा उचलणारी गाडी जात असताना चाकाखाली शुभम आला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे वसार गावातील नागरीकांनी कचरा कंपनीच्या कंत्राटदाराविरोधात रोष व्यक्त केला आहे. पोलिसांनी कचरा गाडी चालक स्वप्नील लाड याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. गावातील स्थानिक नागरीकांनी सांगितले की, गाडी पुढे मुलगा आहे असे चालकाला सांगून देखील चालकाने काही एक ऐकले नाही. त्यामुळे मुलाचा गाडी खाली सापडून मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
मुलाच्या कुटुंबियांना महापालिकेने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील नागरीकांनी केली आहे. या अपघात प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या अपघात प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल.
सुमित एल्को प्लास्ट या कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून योग्य प्रकारे कचरा संकलन केले जात नसल्याचा आराेप काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत करण्यात आला होता. आज कचरा गाडी खाली सापडून दोन वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याने कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Web Summary : In Kalyan, a two-year-old boy died after being hit by a garbage truck. Police arrested the driver. Locals allege negligence and demand compensation from the municipality, which has ordered an inquiry into the incident. The garbage collection company faces scrutiny.
Web Summary : कल्याण में कचरा ट्रक की चपेट में आने से दो साल के बच्चे की मौत हो गई। पुलिस ने ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है। स्थानीय लोगों ने लापरवाही का आरोप लगाया और नगर पालिका से मुआवजे की मांग की है, जिसने घटना की जांच का आदेश दिया है। कचरा संग्रहण कंपनी जांच के दायरे में है।