शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:35 IST

Swapna Barman : स्वप्ना बर्मन यांच्या घराला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान, जलपाईगुडीमधील राजगंज विधानसभेच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवार आणि सुवर्णपदक विजेती एथलीट स्वप्ना बर्मन यांच्या घराला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्वप्ना यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मी राजकारणात येऊन चूक केली, त्यांनी माझं घर जाळलं." ही आग कशी लागली याचा तपास आता केला जात आहे.

जलपाईगुडीच्या पटकाटा ग्रामपंचायतीमधील घोष पाडा येथे स्वप्ना यांची दोन घरं आहेत. स्वप्ना बर्मन आपल्या कुटुंबासह यातील एका घरात राहतात. त्यांच्या जुन्या घराला आग लागल्याची बातमी समोर आली आणि खळबळ उडाली. स्वप्ना यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाऊंटवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आग पसरू शकली नाही. घराच्या आतील भागातील आग विझली होती आणि अग्निशामक दलाने तातडीने त्यावर नियंत्रण मिळवलं.

"स्वप्ना यांच्या घरात कोणीही राहत नव्हतं"

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्ना यांच्या त्या घरात कोणीही राहत नव्हतं. एका खोलीत काही जळाऊ लाकडं आणि कागदपत्रं ठेवली होती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग नेमकी कशी लागली, याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे स्वप्ना यांनी फेसबुक पोस्टद्वारे ज्या राजकीय कारस्थानाचा इशारा दिला आहे, त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या

खालच्या पातळीचं राजकारण

काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, नोकरीतून काढून टाकल्यामुळे आणि आता निवडणूक हरल्यामुळे त्रस्त झालेल्या स्वप्ना सहानुभूती मिळवण्यासाठी असं करत आहेत. या कृत्याला 'नाटक' म्हणत लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र स्वप्ना यांच्या समर्थकांनी भाजपावर बोट ठेवत, भाजपा अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

"आमच्या जुन्या घराला आग लावली"

या प्रकरणाबाबत जलपाईगुडी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरनाथ यांनी सांगितलं की, "नेमकं काय घडलं, याचा आम्ही तपास करत आहोत." स्वप्ना यांचे मोठे भाऊ असित बर्मन म्हणाले, "आमच्या जुन्या घराला आग लावली गेली आहे." तर जिल्हा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा महुआ गोप म्हणाल्या, "स्वप्ना यांनी रडत रडत फोन केला आणि त्यांचं घर जाळल्याचे सांगितलं. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला तिथे जाऊन पाहणी करण्यास सांगितलं आहे. मी स्वतः पोलीस अधीक्षकांनाही याची माहिती दिली आहे. तिथे नेमकं काय घडलं होतं याचा आम्ही शोध घेत आहोत."
 

English
हिंदी सारांश
Web Title : TMC Candidate's House Set Ablaze; Swapna Barman regrets joining Politics.

Web Summary : Post-election violence in West Bengal: TMC candidate Swapna Barman's house was set on fire. Barman regrets entering politics. Police are investigating the incident.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारणfireआग