Join us
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:54 IST

PPF Investment: ही एक अशी सरकारी योजना आहे, जिथे परताव्याची पूर्ण हमी मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय असून याद्वारे मोठा निधी उभारता येतो.

PPF Investment: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक अशी सरकारी योजना आहे, जिथे परताव्याची पूर्ण हमी मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय असून याद्वारे मोठा निधी उभारता येतो. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. विशेष म्हणजे, जुन्या कर रचनेनुसार या योजनेतील गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. म्हणजेच गुंतवणूकदारांना यातून तिहेरी फायदा होतो. जुन्या कर प्रणालीत ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते, मात्र नवीन कर रचनेत कोणताही कर लाभ मिळत नाही.

खातं कुठं उघडता येईल?

पीपीएफ खातं जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी बँकेत अत्यंत सोप्या पद्धतीनं उघडता येतं. या योजनेत किमान १०० ते ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.

वयानुसार गुंतवणुकीचे गणित आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम :

दरमहा २,००० रुपयांच्या गुंतवणुकीनुसार वयानुसार मिळणारा परतावा खालीलप्रमाणे आहे:

वयाच्या ४५ व्या वर्षापासून (१५ वर्षे गुंतवणूक): जर तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी दरमहा २,००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली, तर १५ वर्षांत एकूण गुंतवणूक ३.६० लाख रुपये होईल. त्यावर २.९० लाख रुपये व्याज मिळून मॅच्युरिटीच्या वेळी एकूण ६.५० लाख रुपये मिळतील.

वयाच्या ४० व्या वर्षापासून (२० वर्षे गुंतवणूक): ४० व्या वर्षापासून पुढील २० वर्षे गुंतवणूक केल्यास एकूण ४.८० लाख रुपये जमा होतील. यावर ५.८५ लाख रुपये व्याज मिळून निवृत्तीच्या वेळी एकूण १०.६५ लाख रुपये मिळतील.

वयाच्या ३५ व्या वर्षापासून (६० वर्षे वयापर्यंत): ३५ व्या वर्षी खातं उघडून ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक केल्यास ६ लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीवर १०.४५ लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच ६० व्या वर्षी एकूण १६.४९ लाख रुपये मिळतील.

वयाच्या ३० व्या वर्षापासून (६० वर्षे वयापर्यंत): ३० व्या वर्षापासून दरमहा गुंतवणूक केल्यास ६० व्या वर्षी एकूण २४.७२ लाख रुपये मिळतील. यामध्ये एकूण १७.५२ लाख रुपयांचा निव्वळ फायदा होईल.

वयाच्या २५ व्या वर्षापासून (३५ वर्षे गुंतवणूक): २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास ३५ वर्षांनंतर एकूण ३६.३१ लाख रुपये मिळतील. यात अवघ्या ८.४० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर २७.९१ लाख रुपयांचा मोठा फायदा होतो.

वयाच्या २० व्या वर्षापासून (४० वर्षे गुंतवणूक): विसाव्या वर्षापासून सलग ४० वर्षे गुंतवणूक केल्यास तब्बल ५२.६५ लाख रुपयांचा फायदा होईल. या काळात गुंतवणूकदाराला स्वतःकडून केवळ ९.६० लाख रुपयेच गुंतवावे लागतील.

मुलांच्या नावाने पीपीएफ खाते (जॉइंट अकाउंट):

पालक आपल्या मुलांसाठी देखील पीपीएफ खातं उघडू शकतात, जे एक संयुक्त खातं असेल. मूल १८ वर्षांचं झाल्यानंतर हे खातं सामान्य खातं बनतं. जर पालकांनी मुलाच्या वयाच्या १० व्या वर्षापासून दरमहा २,००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली, तर एकूण १.०८ कोटी रुपये मिळतील. यात अवघ्या १२ लाखांच्या गुंतवणुकीवर ९६.१२ लाख रुपयांचा बंपर फायदा मिळतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : ₹2000 Monthly Investment Yields ₹1.08 Crore at Retirement: Fixed Interest Scheme

Web Summary : PPF offers guaranteed returns, ideal for long-term investment. Starting early with ₹2000 monthly can yield ₹1.08 crore at retirement. It's tax-free under old rules.
टॅग्स :गुंतवणूकपीपीएफपैसा