शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
5
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
10
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
11
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
12
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
13
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
14
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
15
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
16
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
17
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
18
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
19
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
20
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
Daily Top 2Weekly Top 5

"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:40 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका युद्धविरामाबाबत मोठा दावा केला आहे. हा युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर केलेला उपकार होता, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक युद्धविरामाबाबत एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा दावा केला आहे. इराणसोबत झालेला युद्धविराम हा दुसरा काही नसून अमेरिकेने पाकिस्तानवर केलेला एक 'उपकार' होता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली होती. ट्रम्प यांनी या प्रक्रियेत पाकिस्तानी पंतप्रधान आणि तिथल्या फील्ड मार्शलच्या भूमिकेचे कौतुक केले असले, तरी त्यांच्या 'उपकार' या शब्दाने आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते, जे महिन्याभरापेक्षा जास्त काळ चालले. अखेर ८ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला होता.

चीनहून परतताना 'एअर फोर्स वन'मध्ये केला खुलासा

चीनचा दौरा आटोपून अमेरिकेला परतत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'एअर फोर्स वन' या विशेष विमानात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "आम्ही एका दुसऱ्या देशाच्या आग्रहास्तव हा युद्धविराम केला आहे. खरं तर या युद्धाने आमचाच फायदा झाला असता, पण आम्ही पाकिस्तानवर उपकार करत युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला." या संवादादरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानी नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना 'शानदार' असे संबोधित केले.

"इराणला अण्वस्त्र बनवू देणार नाही, युरेनियमही जप्त करणार!"

पाकिस्तानचे कौतुक करत असतानाच ट्रम्प यांनी इराणला मात्र कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे बनवू देणार नाही, या आपल्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला. एवढेच नव्हे तर, तेहरानने गेल्या अनेक वर्षांत जमा केलेले समृद्ध युरेनियम अमेरिका परत घेईल, असेही ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.

इराणच्या अणुप्रकल्पांचे मोठे नुकसान

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुप्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले आहे, असा दावा इराणी वाटाघाटी करणारे अधिकारी करत आहेत. इराण आता पुन्हा अणुइंधन मिळवण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. ट्रम्प यांच्या मते, इराणला काही भयंकर रहस्ये समजली आहेत, परंतु ती नष्ट करण्याचे तंत्रज्ञान, वेळ आणि सराव सध्या इराणकडे नाही.

शी जिनपिंग यांच्यासोबत 'होर्मुझ'वर चर्चा

या दौऱ्यात ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला २० टक्के व्यापारी मार्ग म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या बाजूने शी जिनपिंग देखील आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

इस्लामाबादमध्ये पडले शांततेचे पाऊल

युद्धविरामाच्या घोषणेनंतर दोन्ही देशांमधील वर्षानुवर्षांचे वैर संपवण्यासाठी राजनैतिक हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी ११-१२ एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचा दौरा केला होता. तिथे त्यांनी इराणी नेत्यांशी थेट चर्चा केली, ज्याद्वारे दोन्ही देशांमधील संवाद आणि शांततेची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Ceasefire Claim: A Favor to Pakistan Stuns Global Politics

Web Summary : Trump claims Iran ceasefire was a favor to Pakistan, sparking controversy. Pakistan mediated the US-Iran ceasefire. Trump warned Iran against nuclear weapons, vowing to reclaim uranium. US airstrikes severely damaged Iranian nuclear facilities. Talks with China addressed the Hormuz Strait.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIranइराणWarयुद्ध