शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:04 IST

1 / 6
भारतीय बाजारपेठेत आणि स्वयंपाकघरात भाज्यांचे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. यातीलच एक लोकप्रिय भाजी म्हणजे 'अरबी'. उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात पाहायला मिळणारी ही भाजी चवीला जितकी छान असते, तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते.
2 / 6
दिसायला तपकिरी रंग, खडबडीत त्वचा आणि कापल्यावर आतून पांढरीशुभ्र असणारी ही भाजी आपण सर्वांनीच कधी ना कधी खाल्ली असेल. पण, जर तुम्हाला कोणी विचारले की, या अरबीला इंग्रजीत काय म्हणतात? तर मात्र भलेभले विचार करायला लागतात. जवळपास ९० टक्के लोकांना याचे इंग्रजी नाव सांगता येत नाही. चला तर मग आज जाणून घेऊया अरबीचे इंग्रजी नाव आणि या भाजीशी जोडलेली काही रंजक तथ्ये.
3 / 6
मराठीमध्ये या भाजीला आपण 'अळूच्या मुंडल्या' (अळूचे कंद) या नावाने ओळखतो, ज्याच्या पानांची आपण स्वादिष्ट अळूवडी किंवा अळूचे फतफते बनवतो. सर्वसामान्यपणे 'अरबी' किंवा 'अरवी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाजीला इंग्रजी भाषेत 'टारो रूट' किंवा 'टारो' असे म्हटले जाते.
4 / 6
जर या भाजीच्या वैज्ञानिक नावाबद्दल बोलायचे झाले, तर वनस्पतीशास्त्रात याला 'कोलोकेशिया एस्कुलेंटा' असे म्हणतात. ही वनस्पती 'अरएसी' फॅमिलीशी संबंधित आहे. मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अरबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जगामध्ये नायजेरिया हा देश अरबीचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. भारत आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येही ही एक अतिशय लोकप्रिय भाजी आहे.
5 / 6
भारताच्या विविध प्रांतांमध्ये आणि भाषांमध्ये या भाजीला वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. मराठीत याला 'अळू' म्हटले जाते. तर, उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये याला 'घुइयां' म्हणून ओळखले जाते. पंजाबमध्ये याला 'कचालू' म्हणतात. बंगाली भाषेत याला 'कोचू' असे नाव आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर याला 'डॅशीन', 'कोकोयाम' आणि 'एडो' अशा नावांनीही ओळखले जाते.
6 / 6
भारतात अरबीची मोठ्या प्रमाणावर विक्री आणि वापर केला जातो. भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये अरबीची सर्वाधिक शेती केली जाते. दिसायला एखाद्या झाडाच्या मुळासारखी असणारी ही भाजी तिच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे आणि आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांमुळे भारतासह जगभरात 'टारो रूट' या नावाने मोठ्या आवडीने खाल्ली जाते.
टॅग्स :vegetableभाज्याfoodअन्न