Rules To Follow Before Buying Home: घर खरेदी करणं हा आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आर्थिक निर्णय असतो. परंतु, आपल्या बजेटनुसार किती किमतीचं घर घेणं योग्य आहे, याचं अचूक उत्तर अनेकांना माहीत नसतं. बँक तुम्हाला सहज कर्ज देऊ शकते, पण इन्व्हेस्टमेंट बँकरच्या मते हा मार्ग चुकीचा आहे. खरा प्रश्न हा आहे की, तुम्ही कोणत्याही मानसिक आणि आर्थिक तणावाशिवाय या घराचा खर्च पेलू शकता का?
पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी त्यांनी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत :
१. घराची एकूण किंमत किती असावी?
तुमच्या घराची एकूण किंमत तुमच्या वार्षिक निव्वळ उत्पन्नाच्या म्हणजेच टेक-होम सॅलरीच्या ५ पटीपेक्षा जास्त नसावी. यापेक्षा महाग घर घेतल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रुपये असेल, तर १.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं घर खरेदी करू नये. अन्यथा, ईएमआयचा बोजा वाढून दैनंदिन खर्च भागवणं कठीण होईल.
एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
२. ईएमआय (EMI) ३५ टक्क्यांपेक्षा कमी असावा
तुमच्या महिन्याचा ईएमआय हा हातात येणाऱ्या एकूण पगाराच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. जर ईएमआय ३५ टक्क्यांच्या वर गेला, तर भविष्यातील आणीबाणीच्या परिस्थितीसाठी किंवा इतर खर्चांसाठी तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत, ज्यामुळे कुटुंबावरील मानसिक ताण वाढेल. घर हे सुखासाठी असतं, तणावासाठी नाही, हे नेहमी लक्षात ठेवावं.
३. घराच्या किमतीच्या निम्मी बचत असावी
घर खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे घराच्या एकूण किमतीच्या किमान ५० टक्के रक्कम आधीपासूनच बचत म्हणून जमा असणे आवश्यक आहे.
डाऊन पेमेंट: या ५० टक्क्यांपैकी ३५ टक्के रक्कम घराच्या डाऊन पेमेंटसाठी वापरावी.
इमर्जन्सी फंड: उर्वरित १५ टक्के रक्कम 'लिक्विड बचत' म्हणजेच आणीबाणीचा निधी म्हणून बाजूला ठेवावी. नोकरी जाणं किंवा आजारपण अशा कठीण काळात हा फंड कामी येतो. हा इमर्जन्सी फंड कधीही इतर गोष्टींसाठी खर्च करू नये.
(उदाहरणार्थ: जर १ कोटी रुपयांचे घर घ्यायचे असेल, तर तुमच्याकडे आधीपासून ५० लाख रुपये असले पाहिजेत. त्यातील ३५ लाख डाऊन पेमेंटसाठी आणि १५ लाख इमर्जन्सी फंडासाठी असतील).
४. आधी विमा घ्या
घरासाठी कर्ज घेण्यापूर्वी कुटुंबाची आर्थिक सुरक्षा निश्चित करणं गरजेचं आहे. यासाठी कुटुंबासाठी किमान ५० लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स आणि घराच्या किमतीइतका टर्म लाईफ इन्शुरन्स नक्की घ्या. जेणेकरून भविष्यात काही अघटित घडल्यास कुटुंबावर कर्जाचा डोंगर कोसळणार नाही.
५. किमान ५ वर्षे राहण्याचा प्लॅन असावा
जर तुम्ही त्या घरात किमान ५ वर्षे राहणार असाल, तरच घर खरेदीचा विचार करा. जर अवघ्या २-३ वर्षांत नोकरी किंवा शहर बदलण्याचा विचार असेल, तर घर खरेदी करू नका. कारण घर घेताना आणि विकताना ब्रोकरेज, रजिस्ट्री, कर्जाचं व्याज यामध्ये मोठा खर्च होतो. कमी कालावधीत घर विकल्यास नुकसान होऊ शकतं.
नियमांची पूर्तता करू शकत नसाल तर काय करावं?
जोपर्यंत हे नियम बजेटमध्ये बसत नाहीत, तोपर्यंत घर खरेदीची घाई करू नये. तरीही घर घ्यायचच असेल, तर टियर-२ (Tier-2) शहरांमध्ये स्वस्त पर्यायांचा शोध घेऊ शकता, ज्याचा वापर नंतर निवृत्तीनंतर राहण्यासाठीही करता येईल. हे नियम वरवर कडक वाटत असले, तरी ते तुम्हाला कर्जाच्या मोठ्या बोजापासून वाचवतात.
Web Summary : Buying a home? Follow these rules to avoid debt. Limit home price to 5x annual income, keep EMI below 35% of salary, save 50% of home cost, get insurance, and plan to stay for 5 years.
Web Summary : घर खरीदना चाहते हैं? कर्ज से बचने के लिए इन नियमों का पालन करें। घर की कीमत को वार्षिक आय का 5 गुना रखें, ईएमआई को वेतन का 35% से कम रखें, घर की लागत का 50% बचाएं, बीमा कराएं और 5 साल तक रहने की योजना बनाएं।