Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी

India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी

दुबईतील दिग्गज बँकिंग समूह 'एमिरेट्स एनबीडी'ला भारतातील 'आरबीएल बँक'मधील बहुतांश हिस्सा खरेदी करण्यासाठी भारत सरकार आणि सर्व संबंधित नियामक मंडळांकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:29 IST2026-05-16T14:27:06+5:302026-05-16T14:29:31+5:30

दुबईतील दिग्गज बँकिंग समूह 'एमिरेट्स एनबीडी'ला भारतातील 'आरबीएल बँक'मधील बहुतांश हिस्सा खरेदी करण्यासाठी भारत सरकार आणि सर्व संबंधित नियामक मंडळांकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

PM Modi reaches UAE Emirates NBD buy majority stake RBL Bank 3 billion dollar deal approved government | India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी

India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ देशांच्या दौऱ्याची सुरुवात युएई येथून झाली. या दौऱ्यात भारत आणि युएई दरम्यान ऊर्जा आणि संरक्षणासह अनेक ऐतिहासिक करार झाले. याच दरम्यान, दुबईतील दिग्गज बँकिंग समूह 'एमिरेट्स एनबीडी'ला भारतातील 'आरबीएल बँक'मधील बहुतांश हिस्सा खरेदी करण्यासाठी भारत सरकार आणि सर्व संबंधित नियामक मंडळांकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.

३ अब्ज डॉलरचा महाकरार

एमिरेट्स एनबीडी आरबीएल बँकेतील ६०% हिस्सा सुमारे ९५.९ कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. हे अधिग्रहण २८० रुपये प्रति शेअर या दरानं प्रिफरेंशियल इश्यूच्या माध्यमातून केलं जाईल. हा एकूण करार सुमारे ३ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २६,८५० कोटी रुपयांचा आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील इक्विटी फंड उभारणीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरली आहे.

LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या

भारतीय बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच अशी परवानगी

भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे, जेव्हा एखाद्या परदेशी बँकिंग संस्थेला भारतातील नफ्यात चालणाऱ्या बँकेतील बहुतांश हिस्सा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओपन ऑफरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आरबीएल बँकेत एमिरेट्स एनबीडीचा एकूण हिस्सा ५१% ते ७४% च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

आरबीएल बँकेचे स्वरूप बदलणार

नवे प्रवर्तक : हा करार पूर्ण झाल्यानंतर एमिरेट्स एनबीडीला आरबीएल बँकेचे प्रोमोटर म्हणून वर्गीकृत केलं जाईल.

परदेशी बँकेची उपकंपनी : आरबीएल बँक आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार एका परदेशी बँकेची उपकंपनी म्हणून काम करेल.

शाखांचं विलीनीकरण : आगामी काळात एमिरेट्स एनबीडीच्या मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथील भारतीय शाखांचं आरबीएल बँकेत विलीनीकरण केलं जाईल.

या कराराचं महत्त्व काय?

एमिरेट्स एनबीडी समूहाचे सीईओ शेन नेल्सन यांनी सांगितलं की, या मंजुरीमुळे त्यांची बँक संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यातील व्यापार, संपत्ती आणि गुंतवणुकीच्या कॉरिडॉरच्या केंद्रस्थानी आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत एमिरेट्स एनबीडीची एकूण मालमत्ता सुमारे ३२७ अब्ज डॉलर असून ती १३ देशांमध्ये आपल्या सेवा देत आहे. या मोठ्या गुंतवणुकीमुळे आरबीएल बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल आणि भारत-युएई आर्थिक संबंधांना एक नवी दिशा मिळेल.

Web Title : भारत-यूएई सौदा: अमीरात एनबीडी ने मोदी यात्रा के बाद आरबीएल बैंक में हिस्सेदारी खरीदी।

Web Summary : पीएम मोदी की यूएई यात्रा के दौरान, अमीरात एनबीडी को 3 अरब डॉलर में आरबीएल बैंक में बहुमत हिस्सेदारी हासिल करने की मंजूरी मिली। यह पहली बार है जब कोई विदेशी बैंक एक लाभदायक भारतीय बैंक को नियंत्रित करेगा, जिससे भारत-यूएई आर्थिक संबंध मजबूत होंगे।

Web Title : India-UAE deal: Emirates NBD acquires RBL Bank stake after Modi visit.

Web Summary : During PM Modi's UAE visit, Emirates NBD received approval to acquire a majority stake in RBL Bank for $3 billion. This marks the first time a foreign bank will control a profitable Indian bank, strengthening India-UAE economic ties and boosting RBL's financial position.