Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:08 IST

India Petrol Tax Rate: महाराष्ट्र-गुजरातसारख्या राज्यांमध्ये किती कर आकारला जातो? पाहा...

India Petrol Tax Rate: भारतात पेट्रोल आणि डिझेल सध्या जीएसटीच्या (GST) कक्षेबाहेर आहेत. यामुळे प्रत्येक राज्य सरकार आपल्या गरजेनुसार इंधनावर 'व्हॅट' (VAT - व्हॅल्यू अॅडेड टॅक्स) आणि इतर सेस (Cess) आकारते. परिणामी, देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीत मोठी तफावत पाहायला मिळते. कुठे टॅक्स खूप कमी आहे, तर कुठे तो गगनचुंबी आहे; ज्याचा थेट फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे.

सर्वाधिक टॅक्स आकारणारी राज्ये कोणती?

देशात पेट्रोलवर सर्वाधिक 'व्हॅट' आकारण्यात तेलंगणा राज्य अव्वल क्रमांकावर आहे. तेलंगणामध्ये तब्बल ३५.२० टक्के व्हॅट वसूल केला जातो, जो संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ इतर राज्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

आंध्र प्रदेश: ३१ टक्के + ₹४ प्रति लीटर + रोड डेव्हलपमेंट सेस

केरल: ३०.०८ टक्के + ₹१ प्रति लीटर + इतर सेस

कर्नाटक: २९.८४ टक्के

राजस्थान: २९.०४ टक्के + रोड डेव्हलपमेंट सेस

मध्य प्रदेश: २९ टक्के + ₹२.५० प्रति लीटर + १ टक्का सेस

ओडिशा: २८ टक्के

महाराष्ट्र: २५ टक्के + ₹५.१२ प्रति लीटर अतिरिक्त टॅक्स

पश्चिम बंगाल: २५ टक्के + सेस

मणीपूर: २५ टक्के

मध्यम टॅक्स आकारणारी राज्ये

आसाम: २४.७७ टक्के किंवा ₹१८.८० प्रति लीटर

छत्तीसगड: २४ टक्के + ₹२ प्रति लीटर

बिहार: २३.५८ टक्के + सरचार्ज

नागालँड: २१.७५ टक्के

गोवा: २१.५ टक्के + ग्रीन सेस

दिल्ली: १९.४० टक्के

उत्तर प्रदेश: १९.३६ टक्के किंवा ₹१४.८५ प्रति लीटर

हरियाणा: १८.२० टक्के + अतिरिक्त टॅक्स

सर्वात कमी टॅक्स आकारणारी राज्ये 

देशात अशीही काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे पेट्रोलवर खूपच कमी कर आकारला जातो. अंदमान आणि निकोबारमध्ये देशातील सर्वात कमी म्हणजे अवघा १ टक्का टॅक्स आहे.

लक्षद्वीप: १० टक्के

तामिळनाडू: १३ टक्के + ₹११.५२ प्रति लीटर

गुजरात: १३.७ टक्के + सेस

अरुणाचल प्रदेश: १४.५०  टक्के

अंदमान आणि निकोबार: १ टक्का (देशात सर्वात कमी)

राज्यांमधील टॅक्सचा हा फरक नेमका काय सांगतो?

पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्समध्ये राज्या राज्यांमध्ये ३४ टक्क्यांपेक्षा जास्त फरक आहे. याचा सोपा अर्थ असा की, जर एखाद्या ठिकाणी पेट्रोलची मूळ किंमत (Base Price) १०० रुपये असेल, तर काही राज्यांमध्ये त्यावर ३५ रुपयांपर्यंत टॅक्स लावला जातो, तर अंदमानसारख्या ठिकाणी केवळ १ रुपया टॅक्स लागतो. हाच कारण आहे की शेजारील राज्यांच्या सीमांवर पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लीटर ५ ते १० रुपयांचा फरक सहज पाहायला मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol-Diesel Tax Rates Vary Widely Across Indian States: A Breakdown

Web Summary : Petrol and diesel taxes differ greatly across Indian states due to VAT and cesses. Telangana levies the highest at 35.20%, while Andaman & Nicobar has the lowest at 1%. This variance causes price differences of ₹5-₹10 per liter in bordering states.
टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेलमहाराष्ट्रगुजराततेलंगणा