शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:14 IST

Priyanka Mishra Death Case: गोरखपूरची रहिवासी असलेल्या ३० वर्षीय प्रियंका मिश्राचा लग्नानंतर अवघ्या १४ व्या दिवशी झाशी येथील मिशन कंपाउंडमधील सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला.

Priyanka Mishra Death Case: गोरखपूरची रहिवासी असलेल्या ३० वर्षीय प्रियंका मिश्राचा लग्नानंतर अवघ्या १४ व्या दिवशी झाशी येथील मिशन कंपाउंडमधील सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रियंका दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. पती शुभमचा दावा आहे की, प्रियंका गच्चीच्या कठड्यावर बसली होती आणि मजा मस्करी करत असताना तोल गेल्याने ती खाली पडली. मात्र प्रियंकाच्या माहेरच्यांनी हा एक सुनियोजित कट आणि हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि शुभमचं लग्न एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून ठरलं होतं. सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या या ओळखीनंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने २८ एप्रिल रोजी थाटामाटात लग्न पार पडलं. प्रियंका उच्चशिक्षित होती, तिने इंग्रजी विषयात 'डबल एमए' आणि 'बीएड' केलं होतं, तर शुभमने 'बीएएमएस'चं शिक्षण पूर्ण केलं होतं. लग्नानंतर २ मे रोजी रिसेप्शन झालं आणि घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोमवारी एका  कार्यक्रमादरम्यान ही भयंकर घटना घडली.

लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."

पतीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

घटनेच्या वेळी पती शुभम हा प्रियंकासोबत गच्चीवर उपस्थित होता. शुभमचं म्हणणं आहे की, ते दोघे गप्पा मारत होते आणि प्रियांका गमतीने गच्चीच्या कठड्यावर बसली होती. वारंवार मनाई करूनही तिने ऐकलं नाही आणि तिचा तोल गेला. मात्र, इतक्या कडक उन्हात ते दोघे गच्चीवर का गेले होते? याचं उत्तर शुभम देऊ शकला नाही. हा केवळ अपघात होता की दोघांमध्ये काही वाद झाला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

माहेरच्यांचा हुंडाबळीचा आरोप

प्रियंकाच्या मृत्यूची बातमी समजताच गोरखपूरहून आलेल्या तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रियंकाचा भाऊ रत्नेश याने आरोप केला आहे की, लग्नानंतर सासरचे लोक सोन्याचे दागिने, १० लाख रुपये रोख आणि कारची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण न झाल्याने प्रियंकाचा छळ केला जात होता. कुटुंबीयांच्या मते, प्रियंका अत्यंत समजूतदार होती आणि ती अशा प्रकारची धोकादायक कृती कधीच करू शकत नाही. तिला मुद्दाम गच्चीवर नेऊन ढकलून देण्यात आलं असावं असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

शेवटचा फोन आणि पोलीस कारवाई

घटनेच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वी प्रियंकाने आपल्या आईला फोन केला होता, मात्र तिचं बोलणं होऊ शकलं नाही. तिला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची होती असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. एसपी सिटी प्रीती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरच्यांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस घरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे मृत्यूचे नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Bride dies after 14 days; husband under suspicion.

Web Summary : A bride died suspiciously 14 days after her wedding in Jhansi. The husband claims she fell accidentally, but the family alleges dowry murder. Police investigate, reviewing CCTV footage and filing FIR against the husband and in-laws.
टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश