शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:20 IST

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये ऐतिहासिक भेट झाली. दोन्ही नेत्यांनी मैत्रीचा हात पुढे करत जगाचे भविष्य बदलण्याचे वक्तव्य केले आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीनमधील संबंधांनी आता एक नवे वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी "मैत्री आणि सहकार्या"वर भर दिला. "आम्ही मिळून जगाचे भविष्य बदलू," असा विश्वास व्यक्त करत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, व्यापार आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

"तुम्ही महान नेते आहात!"; ट्रम्प यांच्याकडून जिनपिंग यांचे कौतुक

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाचे मुक्तकंठाने कौतुक केले. ट्रम्प म्हणाले की, "आमचे एकमेकांशी असलेले संबंध खूप चांगले आहेत. जेव्हाही एखादी समस्या आली, तेव्हा आम्ही फोनवर बोलून ती तातडीने सोडवली. कोणत्याही दोन राष्ट्राध्यक्षांमध्ये असलेलं हे आतापर्यंतचं सर्वात प्रदीर्घ आणि घनिष्ठ नातं आहे, असं मला वाटतं. मी सर्वांना सांगू इच्छितो की, जिनपिंग हे एक महान नेते आहेत. काही लोकांना माझे हे बोलणे आवडत नाही, पण मी हे सत्य वारंवार बोल राहीन."

बिझनेस टायकुन्सचा ताफा सोबत

ट्रम्प यांनी केवळ राजकीय चर्चाच केली नाही, तर अमेरिकेतील बड्या उद्योगपतींनाही सोबत नेले आहे. "मला कंपन्यांमधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे लोक नको होते, तर फक्त 'टॉप'चे लोक हवे होते. हे सर्वजण चीनसोबत व्यापार करण्यास उत्सुक आहेत," असे ट्रम्प यांनी बैठकीत नमूद केले.

'थ्यूसीडाइड्स ट्रॅप'चा उल्लेख आणि जिनपिंग यांचा संयम

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही ट्रम्प यांचे ९ वर्षांनंतर चीनमध्ये स्वागत करताना जागतिक परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी विचारले की, "चीन आणि अमेरिका ‘थ्यूसीडाइड्स ट्रॅप’मधून बाहेर पडून मोठ्या राष्ट्रांच्या संबंधांचा एक नवा आदर्श निर्माण करू शकतात का?"

थ्यूसीडाइड्स ट्रॅप म्हणजे काय?

जेव्हा एखादी उदयास येणारी महासत्ता प्रस्थापित महासत्तेला आव्हान देते, तेव्हा त्यांच्यात संघर्ष किंवा युद्ध अटळ असते, यालाच थ्यूसीडाइड्स ट्रॅप म्हणतात.

आम्ही शत्रू नाही, सहकारी आहोत!

शी जिनपिंग यांनी स्पष्ट केले की, चीन आणि अमेरिका हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून सहकारी आहेत. "दोन्ही देशांच्या संघर्षात जगाचे नुकसान आहे आणि सहकार्यात फायदा. आपल्यातील मतभेदांपेक्षा आपले समान हितसंबंध जास्त महत्त्वाचे आहेत," असे जिनपिंग यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगAmericaअमेरिकाchinaचीन