शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 08:58 IST

Prateek Yadav Death News: फिटनेस आयकॉन प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह याचे सुपुत्र प्रतीय यादव यांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रतीक यादव यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. 

घरातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची तब्येत बिघडली, तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली घरातच होत्या आणि त्यांच्या पत्नी पत्नी अपर्णा यादव या एका शपथविधी समारंभासाठी आसामध्ये गेल्या होत्या. मंगळवारी सांयकाळी अपर्णा यादव यांना प्रतीक यादव यांची तब्येत बिघडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अपर्णा यांनी वारंवार फोन करून प्रतीक यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि संपर्कात राहिल्या. मंगळवारी सायंकाळी साधारण ६.०० वाजण्याच्या सुमारास अपर्णा यांनी पुन्हा फोन केला असता प्रतीक हे  त्यांच्या खोलीत विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अपर्णा यादव यांनी पुन्हा फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतीक यादव हे झोपले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

प्रतीक यादव बुधवारी पहाटे ५:०० च्या सुमारास त्यांच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे लक्षात येताच, तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला कळवण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधून एक आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर, प्रतीक यांना ताबडतोब सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

डॉक्टरांच्या मते, त्यांच्या शरीरात हालचालीचे कोणतेही लक्षण नव्हते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरीच होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्यांना चालण्या-फिरण्यात सतत अडचण येत होती. त्यांना ३० एप्रिलला मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Prateek Yadav's Last 24 Hours: What Happened Before Death?

Web Summary : Prateek Yadav, Mulayam Singh's son, died of a heart attack. Before his death, he was resting at home, recovering from leg surgery. His wife, Aparna, was in Assam and tried to contact him but couldn't reach him late at night. He was found unconscious the next morning and declared dead at the hospital.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारण