मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर गतिमान झाली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मंगळवार-बुधवारी मनस्ताप सहन करावा लागला. माध्यमिक शिक्षण विभागाने केवळ एकच हेल्पलाइन क्रमांक दिल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी संपर्क साधत असून तो क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याची पालकांची तक्रार आहे.
दहावीचा निकाल लागल्याच्या आनंदात असलेले विद्यार्थी अकारावी प्रवेशाच्या ऑनलाइन अर्जामुळे सध्या त्रस्त आहेत. नेरूळ येथील राजवीर अशोक पाटील या विद्यार्थ्याला लॉगिन करण्यासाठी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ अडचण आल्याचे पालकांनी सांगितले.
पालघर, ठाणे, बोरिवली, अंधेरी, भायखळा, मुलुंड आणि भांडुप परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनाही बुधवारी तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती पालक राजेश पाटील यांनी दिली.
आणखी केंद्रांची मागणी
विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राज्यस्तरावर किमान १० स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक किंवा सर्व विभागीय संपर्क क्रमांक शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर करावेत, तक्रार निवारण कक्ष मुंबईच्या लोकसंख्येसाठी अजून १० केंद्र सुरू करावी, अशी मागणी पालकांनी केली. दुपारी एकनंतर मात्र तांत्रिक समस्या सुटल्याचे काही पालकांनी सांगितले.
मुंबईसाठी ७ तक्रार निवारण केंद्र
मुंबई शहर, उपनगर ३ केंद्र : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, ८ वा मजला, गोरेगावकर मिल आयुर्वेदिक हॉस्पिटल, चर्नी रोड, मुंबई. संपर्क अधिकारी : बाबासाहेब चिमणे, विराज चेंबळकर
चर्नी रोड : बी.जे.पी.सी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चर्नी रोड, मुंबई. संपर्क अधिकारी : रमेश कांबळे, नीता मिसाळ.
कुर्ला : श्री. स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नेहरू नगर, बस डेपोच्या मागे, कुर्ला (प), मुंबई शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग, मुंबई. संपर्क अधिकारी : संताेष कंठे, श्री. मेघा थापा.
विलेपार्ले : शिक्षण निरीक्षक, पश्चिम विभाग, जोगेश्वरी. पत्ता : साठये कनिष्ठ महाविद्यालय, विलेपार्ले (पु.), मुंबई. संपर्क अधिकारी हेमलता गवित, भाऊसाहेब पळव.
ठाणे : आनंद विश्व गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज, रुघनाथ नगर, वागळे इस्टेट, जि.ठाणे. संपर्क अधिकारी - छाया पराडके, महेंद्र मालपोटे.
रायगड : व्ही. के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पनवेल, संपर्क : सुनीता चांदोरकर, संतोष भोईर.
पालघर : थीम ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बेटेगाव, बोईसर (पू.), ता. जि. पालघर. संपर्क अधिकारी : राजेंद्र पाटील, शिल्पा किणी, सुमित म्हात्रे.
Web Summary : Technical glitches marred the online 11th admission process, causing distress to students and parents. Helpline congestion added to the frustration, prompting calls for more support centers and helplines to resolve issues efficiently across Maharashtra.
Web Summary : 11वीं ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया में तकनीकी गड़बड़ियों के कारण छात्र और अभिभावक परेशान रहे। हेल्पलाइन पर भीड़ ने निराशा बढ़ाई, जिससे महाराष्ट्र में समस्याओं को कुशलतापूर्वक हल करने के लिए अधिक सहायता केंद्रों की मांग उठी।