मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह विदर्भातील वाशीम, अकोला, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही युवकांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
भरती नेटवर्कवर विशेष लक्ष; उच्चशिक्षित तरुण सहभागी
गुप्तचर यंत्रणांनी भट्टीच्या भरती नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चालणारे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पंजाबमध्ये हल्ल्यांचे कट रचण्यासाठी हे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय होता; मात्र त्याचे देशभरातील कनेक्शन समोर येत आहे.
अकोला : दहशतवाद विरोधी पथकाने वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एका तरुणाला ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. त्यांचे पाकिस्तानशी नेमके कोणते संबंध आहेत, याचा तपास सुरू आहे.
नागपूर : गोंदियातील एका मोबाइल दुकानात काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. चंद्रपूरमधूनही एका युवकाला पथकाने ताब्यात घेतले आहेत. हे दोघे भट्टीशी संपर्कात हाेते का? ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.
नाशिक : एटीएसच्या नाशिक शाखेकडून शहरात तसेच मालेगावातसुद्धा बुधवारी छापे टाकून चार संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तर उत्तर महाराष्ट्रात आठ जणांकडे चौकशी करण्यात आली.
पुणे : वारजे परिसरासह चाकण आणि शिरूर भागात एटीएसने कारवाई केली.
नांदेड : शहरातील देगलूर नाका, इतवारा भागात राहणाऱ्या २ तरुणांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले. चौकशीत काही न आढळल्याने त्यांना सोडून दिले.
Web Summary : Maharashtra ATS detained youths across Maharashtra linked to Pakistani gangster Shahzad Bhatti via social media. Raids occurred in Mumbai, Pune, Nashik, and Vidarbha. The ATS is investigating their connections, focusing on Bhatti's recruitment network. Some were released after questioning.
Web Summary : महाराष्ट्र एटीएस ने पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी से जुड़े युवाओं को हिरासत में लिया। मुंबई, पुणे, नाशिक और विदर्भ में छापेमारी हुई। एटीएस उनके संबंधों की जांच कर रही है, भट्टी के भर्ती नेटवर्क पर ध्यान केंद्रित है। पूछताछ के बाद कुछ को रिहा कर दिया गया।