शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:44 IST

बिअर पिणाऱ्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात, असे नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. 

नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासांतून काही रंजक तथ्ये समोर आली आहेत. बिअर पिणाऱ्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात, असे सिद्ध झाले आहे. संशोधकांनी इशारा दिला आहे की, केवळ बिअर प्रेमीच नव्हे, तर गर्भवती महिलांनाही डास अधिक चावतात. दरम्यान, ४६५ व्यक्तींवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या व्यक्तींनी गेल्या २४ तासांत बिअरचे सेवन केले होते, त्यांच्याकडे  बिअर न पिणाऱ्यांच्या तुलनेत १.३५ पट अधिक डास आकर्षित  झाले.

बिअर प्यायल्यामुळे मानवी शरीराचे तापमान वाढते, जे डासांना लांबूनच जाणवते. अल्कोहोलमुळे श्वसनाचा वेग बदलतो आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते. बिअरच्या सेवनामुळे शरीराचा नैसर्गिक गंध बदलतो, जो डासांना आमंत्रण देणारा ठरतो. अनेकांचा असा समज असतो की, विशिष्ट ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना डास जास्त चावतात. मात्र, फ्रान्समधील 'इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट'चे शास्त्रज्ञ फ्रेडरिक सिमार्ड यांनी हा दावा फेटाळून लावला.  त्यांच्या मते, रक्ताचा प्रकार किंवा डोळ्यांचा रंग यांचा डासांशी संबंध नसून, शरीरातून उत्सर्जित होणारी रसायने महत्त्वाची ठरतात.

मानवी शरीर शेकडो रसायने उत्सर्जित करते. त्यापैकी मशरूम अल्कोहोल हे रसायन डासांना आकर्षित करण्यात सर्वात प्रभावी ठरते. ज्यांच्या शरीरात या रसायनाचे प्रमाण अधिक असते, त्यांना डास जास्त चावतात. बिअर प्यायल्यामुळे शरीराचे तापमान वाढते, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते आणि शरीराचा नैसर्गिक गंध बदलतो. नेदरलँड्सच्या शास्त्रनांनी एकूण ४६५ लोकांवर केलेल्या संशोधनानुसार, सामान्य लोकांच्या तुलनेत बिअर पिणाऱ्या लोकांना जास्त प्रमाणात जास्त चावतात. केवळ बिअर प्रेमीच नव्हे, तर गर्भवती महिलांनाही डास अधिक चावतात. या संशोधनातून असे स्पष्ट होते आहे की, शरीराचा गंध आणि शरीरातून उत्सर्जित होणारी रसायने यांमुळेच डास आपल्याकडे आकर्षित होतात.

दरम्यान, हवामान बदलामुळे हा धोका आणखीच वाढला आहे. डास आता अशा प्रदेशांमध्येही पसरू लागले आहेत, जिथे यापूर्वी त्यांची उपस्थिती नगण्य होती. टायगर मॉस्किटो हा डास चिकुनगुनियासारखे आजार पसरवण्यासाठी ओळखला जातोय, तो आता थंड हवामान अशलेल्या प्रदेशात असलेल्या प्रदेशांमध्येही पोहोचला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Drink Beer? Mosquitoes Bite You More! Know The Reason.

Web Summary : Beer drinkers attract more mosquitoes due to increased body temperature, altered breath, and changed body odor. Research confirms mosquitoes are drawn to specific chemical emissions, not blood type. Climate change expands mosquito habitats, increasing disease risks.
टॅग्स :ResearchसंशोधनInternationalआंतरराष्ट्रीय