साउथमध्ये आपल्या साधेपणाने आणि अभिनय कौशल्याने सर्वांचं मन जिंकणारी अभिनेत्री साई पल्लवीने 'एक दिन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. मात्र या सिनेमातील तिचं हिंदी ऐकून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. साई पल्लवी आगामी बिग बजेट 'रामायण' सिनेमात दिसणार आहे. त्यात ती सीतेच्या भूमिकेत आहे. मात्र आता 'एक दिन'च्या अनुभवानंतर 'रामायण'च्या मेकर्सलाही तिच्या हिंदीवर शंका आली आहे. यासाठी त्यांनी साई पल्लवीबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.
एबीपी न्यूज रिपोर्टनुसार, 'रामायण'चे मेकर्स आणि निर्माते साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेतील डायलॉग्सचं डबिंग करुन घ्यायचा विचार करत आहेत. 'रामायण' सिनेमातील तिची भाषा जास्त स्पष्ट आणि खरी वाटावी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सीतेची भूमिका असल्याने तिचे हिंदी उच्चार शुद्धच असणं अपेक्षित आहे. दरम्यान यासंदर्भात अद्याप मेकर्सने अधिकृत भाष्य केलेलं नाही.
साई पल्लवीने आमिर खान प्रोडक्शनच्या 'एक दिन' सिनेमातून हिंदीत पदार्पण केलं. यामध्ये ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत झळकली. मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला आहे. त्यातच साईच्या हिंदीवरुन सोशल मीडियावर बरंच ट्रोलिंग झालं आहे.
'ही आहे साई पल्लवी जी हिंदीचे बेसिक शब्दही नीट बोलू शकत नाही. आता ती 'रामायण'मध्ये सीतेच्या भूमिकेत आहे','मला वाटतं साईने हा सिनेमा केवळ रामायण च्या आधी तिचे हिंदी उच्चार सुधारण्यासाठीच केला होता','नितेश तिवारीने सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीला घेतलं जी हिंदीही बोलू शकत नाही? किती वाईट कास्टिंग आहे' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या.
'एक दिन'ने देशात केवळ ५.२ कोटींची कमाई केली तर जगभरात सिनेमाने फक्त ५.४७ कमावले. 'रामायण' सिनेमात साई पल्लवीच्या जागी आधी आलिया भटला ऑफर देण्यात आली होती. मात्र तारखांच्या कारणामुळे तिने सिनेमा नाकारला. 'रामायण पार्ट १' यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.
Web Summary : Sai Pallavi faced trolling for her Hindi in 'Ek Din.' Now, 'Ramayana' makers are considering dubbing her dialogues due to concerns about her Hindi pronunciation for the role of Sita. The film is slated for a Diwali release.
Web Summary : साई पल्लवी को 'एक दिन' में उनकी हिंदी के लिए ट्रोल किया गया. अब, 'रामायण' के निर्माता सीता की भूमिका के लिए उनके हिंदी उच्चारण को लेकर चिंतित हैं और उनके संवादों को डब करने पर विचार कर रहे हैं। फिल्म दिवाली पर रिलीज होने वाली है।