शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 11:40 IST

सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे

ठळक मुद्देमृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये करत होता काम नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासीअक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा केला आरोप

मुंबई/मुझफ्फरपूर - बॉलिवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासी होता. दरम्यान, मृत अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी सांगितले की, रविवारी रात्री ९ वाजता अक्षतचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मात्र त्याच रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याबरोबरच मुंबई पोलीस हे या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षतच्या मामांनी केला आहे. अक्षत उत्कर्ष हा सिकंदरपूर येथील विजयंत चौधरी ऊर्फ राजू चौधरी यांचा पुत्र होता. त्याचा मृतदेह मुंबईहून पाटणा विमानतळावर आणण्यात आला आहे.अक्षतच्या मृत्यूप्रकऱणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही. तसेच या घटनेबाबत सध्यातरी अधिक माहितीची वाट पाहिली जात आहे. दरम्यान जूनमध्ये झालेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. तसेच दररोज नवनवे दावेही होत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

टॅग्स :bollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBiharबिहार