ट्विशा शर्माच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ती पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळली होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आता ट्विशाचे वडील निवनिधी शर्मा यांनी त्यांचा जावई समर्थचे अनेक काळे कारनामे उघड केले आहेत. हनिमूनपासूनच समर्थने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली होती असे तिचे वडील म्हणाले. तिकीट बुकिंगला उशीर झाल्यामुळे त्याने हनिमूनला असताना ट्विशाला पहिल्यांदा धक्का दिला होता.
ट्विशाचे वडील निवनिधी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला अवघा दीड महिना झाला होता तेव्हाच समर्थने तो कसा आहे, याचे संकेत दिले होते. ट्विशाने सुरुवातीला आम्हाला काही सांगितलं नाही, पण नंतर तिने ही गोष्ट आम्हाला सांगितली. ती म्हणाली, "पप्पा, हनिमूनमध्ये तो माझ्याशी कसा वागत आहे हे पाहून मी हैराण झाली. त्यावेळी माझ्या मुलाने ट्विशाची समजूत काढली होती की, अनेकदा माणूस रागाच्या भरात असं करतो, तू या गोष्टीकडे दुर्लक्ष कर. मात्र, त्यानंतर हा प्रकार सतत सुरूच राहिला."
"केसमध्ये अडथळे आणले जाताहेत"
ट्विशाच्या वडिलांचं असंही म्हणणं आहे की, समर्थचे नातेवाईक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे अनेक नातेवाईक न्यायव्यवस्थेत आहेत, ज्यामुळे माझ्या मुलीच्या केसमध्ये अडथळे आणले जात आहेत. या प्रकरणाची सुनावणी भोपाळऐवजी इतर कोणत्याही राज्यात व्हावी आणि तपासही दुसऱ्या राज्यात केला जावा अशी आमची इच्छा आहे.
Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
संपूर्ण यंत्रणा सासरच्या लोकांच्या पाठीशी
'टीव्ही९ भारतवर्ष'शी बोलताना ट्विशाचे वडील निवनिधी शर्मा यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, त्यांना भोपाळमध्ये न्याय मिळण्याची आशा खूप कमी वाटत आहे. संपूर्ण यंत्रणा सासरच्या लोकांच्या पाठीशी उभी असलेली दिसत आहे. परिस्थिती अशी आहे की, आमची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पुढे यायला तयार नाहीत. ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश हे इतके प्रभावशाली आहेत की, त्यांच्या विरोधात कोर्टात उभे राहणंही लोक टाळत आहेत.
"हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
केस भोपाळहून दिल्लीला ट्रान्सफर व्हावी
ट्विशाच्या वडिलांनी शवविच्छेदन अहवालावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अहवालातील अनेक मुद्द्यांमध्ये विसंगती दिसून येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सत्य समोर यावं यासाठी कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी ही केस भोपाळहून दिल्लीला ट्रान्सफर करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
मुलीवर केले जाताहेत खोटे आरोप
गिरिबाला सिंहला मिळालेल्या अटकपूर्व जामिनावरही कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. निवनिधी शर्मा म्हणाले की, हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील काळा डाग आहे आणि तो नेहमी लक्षात ठेवला जाईल. ट्विशावरील ड्रग्जचे आरोपही वडिलांनी पूर्णपणे फेटाळून लावले. त्यांची मुलगी अत्यंत हुशार आणि समजूतदार होती, असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "ट्विशाने तिच्या चॅटमध्ये तिचं दुःख आणि त्रास सांगितला होता. तेच चॅट आज सर्वांसमोर आहे, नाहीतर आमच्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवला नसता."
Web Summary : Twisha Sharma's father alleges her husband abused her from their honeymoon. He claims his daughter was harassed for dowry and that the in-laws, with connections in the judiciary, are obstructing the investigation. He seeks transfer of the case for a fair investigation.
Web Summary : ट्विशा शर्मा के पिता का आरोप है कि उनके पति ने हनीमून से ही उन्हें प्रताड़ित करना शुरू कर दिया था। उन्होंने दावा किया कि उनकी बेटी को दहेज के लिए प्रताड़ित किया गया और ससुराल वाले, जिनके न्यायपालिका में संबंध हैं, जांच में बाधा डाल रहे हैं। वह निष्पक्ष जांच के लिए मामले के हस्तांतरण की मांग करते हैं।