शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:58 IST

Adhik Maas 2026 Number 33 Secret Magic Connection: अधिक महिना येण्याची पद्धत खगोलीय असली, तरी अध्यात्मिक दृष्टीने महत्त्व अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. अधिक मास आणि ३३ आकडा याबाबत जाणून घ्या...

Adhik Maas 2026 Number 33 Secret Magic: यंदा २०२६ चे मराठी वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास आला आहे. ज्येष्ठ अधिक मास सुरू झाला असून, या महिन्यात अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत. अधिक महिना येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलीय असली, तरी त्याचे अध्यात्मिक दृष्टीने महत्त्व अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. अधिक महिन्यात ३३ आकड्याला खास महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ३३ अंकाचे रहस्य आणि कनेक्शन काय मानले जाते, ते जाणून घेऊया...

मराठी पंचांगानुसार हे वर्ष १२ ऐवजी १३ महिन्यांचे असणार आहे. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे. तर, सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो, असे सांगितले जाते. 

अधिक मासात श्रीविष्णूचे ३३ स्वरुप पूजन महत्त्व

अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. या महिन्याचे स्वामी आणि अधिपत्य श्रीविष्णू यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, विष्णु, जिष्णु, महाविष्णु, हरि, कृष्ण, भधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपु, अनिरुद्ध, त्रीविक्रम, वासुदेव, यगत्योनि, अनन्त, विश्वाक्षिभूणम्, शेषशायिन, संकर्षण, प्रद्युम्न, दैत्यारि, विश्वतोमुख, जनार्दन, धरावास, दामोदर, मघार्दन आणि श्रीपति अशा श्रीविष्णूंच्या ३३ स्वरुपांचे पूजन, नामस्मर, उपासना केली जाते. तसेच या महिन्यात श्रीकृष्ण कथा, भगवद्गीता, श्रीराम कथा आणि श्रीनृसिंह रूपाची विशेष पूजा केली जाते. 

अधिक मास ३३ कोटी देवता स्मरण

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ३३ कोटी देवता असल्याचे म्हटले जाते. ३३ कोटी ही संख्या नाही. कोटी हा शब्द या ठिकाणी प्रकार या अर्थाने घेण्यात आलेला आहे. ३३ कोटी देवतांकडे या संपूर्ण सृष्टिचे व्यवस्थापन असल्याची मान्यता आहे. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती आहेत. या प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे. प्रत्येकाचा कार्यभार वेगळा असल्यामुळे याला कोटी म्हटले गेले आहे, असे सांगितले जाते. सृष्टीचे व्यवस्थापन करणाऱ्या या देवतांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करणे अधिक मासात महत्त्वाचे मानले जाते. 

अधिक मास ३३ वस्तूंचे दान

अधिक मास हा साधारणपणे ३३ महिन्यांनी येतो, असे मानले जाते. या अधिक मासात ३३ विविध प्रकारच्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले गेले आहे. जर कुणाला शक्य असेल तर त्यांनी ३३ पटींनी वस्तूंचे दान करावे, असेही म्हटले जाते. मुलीला आणि जावयाला घरी बोलावून ३३ अनारसे देतात, ३३ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात, असेही सांगितले जाते. 

अधिक मास ३३ दीप प्रज्वलन

अधिक मासात सायंकाळी तिन्हीसांजेला दिवेलागणी वेळ झाली की, ३३ दिवे तुळशीपाशी लावले जातात. तुळशी जवळ किंवा देवासमोर दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्याकडे याला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जाते. तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते. 

३३ अंकाचे खास महत्त्व

अंकशास्त्राप्रमाणे ३३ अंकाला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. ३३ अंक हा मास्टर अंक आहे. याचा सकारात्मक प्रभाव पडतो. हा एक शक्तिशाली नंबर मानला गेला आहे. तसेच ३३ या अंकाला गहन आध्यात्मिक, धार्मिक आणि अंकशास्त्रीय महत्त्व आहे. हा अंक करुणा, मार्गदर्शन आणि निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक मानला जातो. हा अंक सूचित करतो की, तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमची ध्येये साध्य करण्यासाठी ब्रह्मांड पाठिंबा देत आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adhik Maas 2026: Significance of number 33 explained.

Web Summary : Adhik Maas in 2026 is special, occurring every three years. The number 33 is significant, linked to deities and auspicious acts like donating 33 items, lighting 33 lamps, and Vishnu's 33 forms. It symbolizes compassion and guidance.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाspiritualअध्यात्मिकAstrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्रVastu shastraवास्तुशास्त्र