Cricketer IPL Failure: बांग्लादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दासने (Litton Das) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबतच्या आपल्या अतिशय छोट्या आणि निराशाजनक आयपीएल कारकिर्दीबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. लिटनने पहिल्यांदाच उघडपणे सांगितले की, केकेआरमध्ये त्याला अपेक्षित असलेला विश्वास आणि पाठिंबा कधीच मिळाला नाही. त्याने असेही म्हटले की, फ्रँचायझीला त्याची खरोखर गरजच नाही असे त्याला सुरूवातीपासूनच वाटत होते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, त्याच्या एकमेव आयपीएल सामन्याच्या अगदी आधी, रात्री ११ वाजता त्याला अचानक एक मेसेजही आला होता. त्याबद्दलही त्याने सांगितले.
केकेआरला कधी माझी गरज नव्हतीच!
बांग्लादेश क्रिकेटच्या 'चार छोक्का' पॉडकास्टवर बोलताना, लिटन दासने केकेआर व्यवस्थापनाच्या संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, 'मला असे वाटले की केकेआरला माझी गरज नाही. संघाने मला अपेक्षेप्रमाणे पाठिंबा दिला नाही. लिटनने स्पष्ट केले की तो सलग दोन सामन्यांसाठी बाहेर बसला होता, पण त्याला संधी कधी मिळेल हे कोणीच सांगितले नव्हते. सहसा, खेळाडूंना पुढचा सामना खेळणार असल्याची माहिती आधीच दिली जाते. पण माझ्या बाबतीत तसे काही घडले नाही. मला अचानक रात्री ११ वाजता 'तू उद्या प्लेइंग ११ मध्ये खेळणार आहेस' असा मेसेज आला. लिटन दासच्या या दाव्यांमुळे सोशल मीडियावर केकेआर संघ व्यवस्थापनाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
लिटन दासने आयपीएलमध्ये पदार्पण कधी केले?
लिटन दासने २० एप्रिल २०२३ रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने जेसन रॉयसोबत डावाची सुरुवात केली, पण तो फक्त ४ धावांवर बाद झाला. त्याने यष्टीरक्षणात काही मोठ्या चुकाही केल्या, ज्यात यष्टीचीत करण्याच्या महत्त्वाच्या संधी गमावण्याचा समावेश होता. केकेआर तो सामना हरला आणि त्यानंतर लिटनला कधीच दुसरी संधी मिळाली नाही. आपल्या खराब पदार्पणाची आठवण सांगताना लिटन दास म्हणाला, "मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये कधीकधी चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात, तर कधीकधी नाही. तो दिवस माझा नव्हता. त्यावेळी केकेआर आपल्या प्लेइंग इलेव्हन आणि परदेशी खेळाडूंमध्ये सतत बदल करत होती. शकिब अल हसनने आधीच स्पर्धा सोडली होती, त्याच्या जागी जेसन रॉयला संघात घेण्यात आले होते."
केकेआरने त्यावेळी जारी केले होते निवेदन
दरम्यान, लिटन दासचा आयपीएल प्रवास फक्त एका सामन्यापुरताच मर्यादित राहिला. त्याला फारशी संधीही मिळाली नाही. तो स्पर्धा संपण्याआधीच बांगलादेशला परतला होता. त्यावेळी, केकेआरने एक निवेदन जारी करून म्हटले होते, "कौटुंबिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे लिटन दासला बांगलादेशला परतावे लागले आहे. आमच्या सदिच्छा त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत." नंतर केकेआरने त्याच्या जागी जॉन्सन चार्ल्सला संघात घेतले होते.
Web Summary : Litton Das reveals disappointment with KKR, citing lack of support. He received a surprise message before his debut. After a poor performance against DC, he was dropped and returned home due to a family emergency. KKR replaced him with Johnson Charles.
Web Summary : लिट्टन दास ने केकेआर से निराशा व्यक्त की, समर्थन की कमी का हवाला दिया। उन्हें अपने पदार्पण से पहले एक अप्रत्याशित संदेश मिला। डीसी के खिलाफ खराब प्रदर्शन के बाद, उन्हें बाहर कर दिया गया और पारिवारिक आपातकाल के कारण घर लौट आए। केकेआर ने उन्हें जॉनसन चार्ल्स से बदल दिया।