शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:50 IST

Vinayaka Chaturthi Angarak Yog Adhik Maas 2026: अधिक मास आणि अंगारक योग यामुळे अधिक ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

Vinayaka Chaturthi Angarak Yog Adhik Maas 2026: दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास सुरू झालेला आहे. यंदा २०२६ मधील अधिक मासात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्यातील पहिला म्हणजे विनायक चतुर्थी अंगारक योग. प्रथमेश असलेल्या गणपतीचे प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला व्रत केले जाते. अधिक मास आणि अंगारक योग यामुळे अधिक ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. विनायक चतुर्थी अंगारक योग व्रत पूजन कसे करावे, कोणत्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा, त्याबाबत जाणून घेऊया...

प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. यंदा, २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे. त्यामुळे दोन चतुर्थी तिथी वाढणार आहेत. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या काळातील व्रताचरणांचे अनेक पटींनी लाभ मिळू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मंगळवार, १९ मे २०२६ रोजी विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. तत्पूर्वी, मे महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला होता.

अधिक मास विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.

अधिक मास अंगारक योग विशेष महात्म्य

अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. 

खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते

अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

अधिक मास विनायक चतुर्थी अंगारक योग व्रत पूजन

विनायक चतुर्थी अंगारक योगावर सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. दिवसभर उपवास करावा. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. 

अंगारक योग चतुर्थीला ‘या’ गोष्ट आवर्जून कराच

मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. गणपतीला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. जास्वंदाचे फूल अर्पण करावे, लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते. अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Adhik Maas 2026: Vinayaka Chaturthi Angarak Yoga, worship for double benefits!

Web Summary : Adhik Maas 2026 brings Vinayaka Chaturthi with Angarak Yoga. Observe Ganapati Vrat with special rituals for enhanced blessings. Recite mantras, offer Durva and Jashwand flowers. Performing this vrata brings prosperity and fulfills desires.
टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीAdhik Maasअधिक महिनाPuja Vidhiपूजा विधीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणcultureसांस्कृतिक