शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
3
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
4
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
7
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
8
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
9
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
10
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
11
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
12
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
13
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
14
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
15
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
16
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
17
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
18
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
19
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
20
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:37 IST

इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यानंतर ती डिलीट न करता थेट एडिट करता येणार आहे. कंपनीने हे भन्नाट फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.

जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेकदा घाईघाईत इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना स्पेलिंग मिस्टेक होते किंवा चुकीचा टॅग किंवा लिंक जोडली जाते. अशा वेळी ती चूक सुधारण्यासाठी पूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा पोस्ट करावी लागायची. मात्र, आता हा मनस्ताप कायमचा थांबणार आहे. कारण, इंस्टाग्रामने आता युजर्ससाठी थेट स्टोरी एडिट करण्याचा पर्याय आणला आहे.

सोशल मीडियावरील काही युजर्सनी याचे स्क्रीनशॉट्स शेअर करत या नव्या अपडेटची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर काही निवडक युजर्ससाठी रोल आउट करण्यात येत असून, लवकरच ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

कसे काम करणार हे एडिट फीचर?

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, स्टोरी पोस्ट केल्यानंतर युजर्सला त्या स्टोरीवर टॅप करावे लागेल. त्यानंतर एक नवा मेनू ओपन होईल, ज्यामध्ये 'Edit'चा पर्याय दिसेल. जेव्हा तुम्ही 'एडिट'वर क्लिक कराल, तेव्हा स्क्रीनवर एक वॉर्निंग पॉप-अप दिसेल. या वॉर्निंगमध्ये स्पष्ट लिहिले असेल की, एकदा तुम्ही एडिटिंग सुरू केल्यास स्टोरीचे मूळ व्हर्जन डिलीट होईल. तसेच, त्या स्टोरीवर आलेले लाईक्स, रिॲक्शन्स आणि कमेंट्स देखील रिसेट होतील. या फीचरमध्ये नेमके काय काय एडिट करता येईल याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अँड्रॉईड युजर्सना थोडी वाट पाहावी लागणार!

इन्स्टाग्रामने हे जबरदस्त फीचर सध्या केवळ आयफोन वापरणाऱ्या मर्यादित युजर्ससाठीच रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अँड्रॉईड युजर्सना या फीचरचा लाभ घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. इंस्टाग्रामच्या मूळ कंपनीने अधिकृतपणे यावर अजून शिक्कामोर्तब केले नसले, तरी चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल, अशी दाट शक्यता आहे.

इन्स्टाग्रामचा दणका; एकापाठोपाठ एक मोठे बदल

गेल्या काही दिवसांत इंस्टाग्रामने युजर्सचा अनुभव बदलण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स आणले आहेत. नुकतेच कंपनीने कमेंट केल्यानंतर १५ मिनिटांच्या आत ती एडिट करण्याचा पर्याय दिला होता. त्याशिवाय 'क्लोज फ्रेंड्स'साठी गायब होणारे फोटो पाठवण्याचे फीचरही आणले होते.

DM मधून एनक्रिप्शन हटल्याने प्रायव्हसी धोक्यात?

याच महिन्यात इन्स्टाग्रामने त्यांच्या डायरेक्ट मेसेजमधून एंड-टू-एंड एनक्रिप्शन हटवले आहे. यामुळे अनेक युजर्स नाराज आहेत, कारण यामुळे चॅटची प्रायव्हसी संपली असून, गरज पडल्यास कंपनी देखील तुमचे मेसेज पाहू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram's Edit Feature Eliminates Story Deletion Hassle for Users

Web Summary : Instagram introduces an edit feature for stories, letting users fix mistakes without deleting. Currently rolling out to iOS users, it will soon be available for Android. Other recent features include comment editing and disappearing photos for close friends.
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया