मुंबई
सोशल मीडियामध्ये 'लोकमत'च्या नावाने आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे एक क्रिएटिव्ह व्हायरल होऊ लागले आहे. 'थोरामोठ्यांचे बोल' या मथळ्याखाली समाजातील प्रसिद्ध व्यक्तींचे प्रेरक विचार 'लोकमत'च्या माध्यमातून प्रसिद्ध केले जातात. परंतु, विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने तयार करण्यात आलेले हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने प्रसिद्ध केलेले नाही. मुळात पाटील यांनी संबंधित विधान केलेलेच नाही.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या क्रिएटिव्हवर लोकमतचं नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. परंतु अशाप्रकारचे कुठलेही क्रिएटिव्ह लोकमतने केलेले नाही. यामुळे लोकमतचा लोगो वापरुन क्रिएटिव्ह अधिकृत असल्याचा गैरसमज लोकांमध्ये निर्माण केला जात आहे. ही बाब निदर्शनास येताच आम्ही त्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच खुद्द विश्वास नांगरे पाटील यांनीही या खोडसाळपणाची तक्रार 'सायबर क्राइम' शाखेकडे केली आहे.
खाली नमूद असलेल्या दोन पेजवरुन ही बनावट पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे...
आपल्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या खोट्या आणि बदनामीकारक पोस्टविरोधात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडे रीतसर तक्रार केली आहे, असे विश्वास नांगरे पाटील म्हटले आहे. आपल्या प्रतिमेला धक्का पोहचवण्यासाठी आणि समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या बनावट पोस्टची निर्मिती करणारे, ती अपलोड करणारे आणि सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा तात्काळ शोध घेऊन चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
Web Summary : A fake 'Lokmat' creative using IPS Vishwas Nangre Patil's name is circulating online. Lokmat clarifies it didn't publish the creative, and Patil never made the statement. He has filed a cybercrime complaint regarding the defamatory post, seeking investigation.
Web Summary : आईपीएस विश्वास नांगरे पाटिल के नाम से 'लोकमत' का एक फ़र्ज़ी क्रिएटिव सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। लोकमत ने स्पष्ट किया कि उसने यह क्रिएटिव प्रकाशित नहीं किया है, और पाटिल ने कभी यह बयान नहीं दिया। उन्होंने मानहानिकारक पोस्ट के संबंध में साइबर अपराध में शिकायत दर्ज कराई है, जिसकी जांच की जा रही है।