नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मुलगी हरवल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, शोधमोहीम सुरू करण्याबाबत पोलिसांकडून “गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जाता येत नाही” असे उत्तर मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना पोलिसांकडून तत्पर कारवाई अपेक्षित होती. मात्र, मुलगी २१ वर्षांची असल्याने ती तिचे निर्णय घेऊ शकते, तिला कुठे जायचे ते जाऊ शकते. असे सांगून वाहनासाठी डिझेल नसल्याचे कारण देण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “ही केवळ निष्काळजीपणा आहे की संपूर्ण यंत्रणेचे अपयश?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात शोधासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचाच अभाव असेल तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Web Summary : A Nagpur family alleges police refused to search for their missing daughter, citing a lack of fuel. The family reported the 21-year-old missing to the police, but the police inaction has sparked public outrage and raised serious questions about police responsiveness.
Web Summary : नागपुर में एक परिवार का आरोप है कि पुलिस ने ईंधन की कमी का हवाला देते हुए उनकी लापता बेटी को खोजने से इनकार कर दिया। परिवार ने 21 वर्षीय लड़की के लापता होने की सूचना पुलिस को दी, लेकिन पुलिस की निष्क्रियता ने सार्वजनिक आक्रोश को जन्म दिया है और पुलिस की जवाबदेही पर गंभीर सवाल उठाए हैं।