मागील काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात इंधनावर झाला आहे. देशात दूध, सोनं-चांदी यामधील दरात वाढ झाली आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता एसटीच्या तिकीट दरातही वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटीला १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते. एसटीला इंडियन ऑईलकडून डिझेल पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात ३ रुपये दर वाढवला आहे. दरवाढीमुळे ३३ लाख ७० हजार आम्हाला जास्त मोजावे लागत आहेत. यामुळे महामंडळाचा वर्षाला १२४ कोटींचा तोटा होतो आहे. जागतिक पातळीवर युद्धाचा भडका उडाल्यास आणखी परिणाम होईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत आवाहन केले आहे. भविष्यात काय होईल हे आता सांगता येत नाही. विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही. उद्या कॅबिनेट बैठक आहे, मुख्यमंत्री असतील तेव्हा त्यांना पत्र देणार आहेत. मे पर्यंत आम्ही थांबणार आहोत. पुढील १० ते १२ दिवस केंद्र आणि राज्य सरकारनं पुर्तता केली तर दरवाढ करणार नाही, मात्र पुर्तता न झाल्यास दरवाढ करावी लागेल, ऑईल कंपनीने पूर्व किंमतीत दिले तर दरवाढ करणार नाही. इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल, असे संकेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
बाईट टॅक्सीबाबत मी सायबर पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत रित्या चालू आहेत. काही अनधिकृत रित्या पेट्रोल बाईक सुरू होत्या. काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. अनेक नियम पायदळी तुडवल्या जात होत्या. यामुळे ही कारवाई केली असेही सरनाईक म्हणाले.
Web Summary : ST ticket prices may increase due to rising fuel costs fueled by the Iran-US conflict. Minister Sarnaik cites a significant diesel price hike impacting the corporation's finances. A decision on fare increase hinges on government support and oil prices, with a final call expected after assessing the situation.
Web Summary : ईरान-अमेरिका संघर्ष के कारण ईंधन की बढ़ती लागत से एसटी टिकट की कीमतें बढ़ सकती हैं। मंत्री सरनाईक ने डीजल की कीमतों में भारी वृद्धि का हवाला दिया जिससे निगम के वित्त पर असर पड़ रहा है। किराए में वृद्धि पर निर्णय सरकार के समर्थन और तेल की कीमतों पर निर्भर करता है।