बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर काळ मानला जातो. हा असा काळ असतो जेव्हा मुलांचं जग फक्त अभ्यास, खेळ, मित्रांसोबतची मजा-मस्ती आणि शांत झोप यापुरतेच मर्यादित असतं. या वयात त्यांच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी नसते. परंतु समाजातील धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. प्रत्येक मुलासाठी बालपण इतकं सोपं नसतं. अशी अनेक मुलं आहेत ज्यांना लहान वयातच आयुष्यातील अडचणींचा सामना करावा लागतो. ती खेळाच्या मैदानात नव्हे, तर रस्त्यावर स्वतःच्या गरजांसाठी संघर्ष करताना दिसतात. असाच एक भावुक करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा महात्मा गांधींच्या रूपात दिसत आहे. त्याने अगदी गांधीजींसारखाच गोल फ्रेमचा चष्मा घातला आहे. इतकेच नाही तर, त्याने आपले तोंड आणि डोकं अशा प्रकारे रंगवलं आहे की ते टक्कल असल्यासारखं दिसेल. त्याच्या संपूर्ण शरीराला चंदेरी रंग लावला होता, ज्यामुळे तो एखाद्या मूर्तीसारखा दिसत होता. पहिल्याच नजरेत हे स्पष्ट समजतं की, हा कोणत्याही शाळेच्या कार्यक्रमाचा किंवा मनोरंजनाचा भाग नाही. या निष्पाप मुलाने हे रूप यासाठी घेतलं होतं जेणेकरून तो रस्त्याच्या कडेला उभा राहून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकेल आणि काही पैसे गोळा करू शकेल.
व्हिडिओमध्ये तो मुलगा अगदी स्थिर उभा असलेला दिसतो. तो जराही न हलता एखाद्या मूर्तीसारखी आपली भूमिका पार पाडत होता. रस्त्यावरून जाणारे लोक त्याच्याकडे पाहत होते, काही जण त्याचे फोटो काढत होते, तर काही जण व्हिडीओ बनवत होते. पण या लहान मुलाचा हे करण्यामागे किती मोठा नाईलाज असू शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न कदाचित कोणीच केला नाही. त्याची ती शांतता आणि स्थिरता बरंच काही सांगून जात होती.
व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी दिसते. ती हळूहळू त्या मुलाजवळ जाते आणि त्याला काहीतरी खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा सुरुवातीला आपली भूमिका सोडत नाही. तो तसाच मूर्तीसारखा उभा राहतो, जणू त्याने स्वतःला पूर्णपणे त्या पात्रात झोकून दिलं आहे. ती मुलगी त्याला वारंवार खाण्यासाठी सांगते, पण तो कोणताही प्रतिसाद देत नाही. कदाचित त्याला भीती असावी की जर तो हलला किंवा त्याने काही खाल्लं, तर लोक त्याला पैसे देणं बंद करतील. पण शेवटी भूक ही भूक असते.
काही वेळानंतर तो मुलगा स्वतःला रोखू शकत नाही आणि अचानक आपलं तोंड उघडतो. तो त्या मुलीच्या हातातून थोडेसं अन्न खातो. हाच क्षण या व्हिडिओचा सर्वात भावुक भाग बनतो. व्हिडिओवर लिहिलेले शब्दही लोकांना विचार करायला भाग पाडतात. त्यावर लिहिलं होतं की, "जग फक्त त्याचे फोटो काढत राहिले, पण त्या छोट्या मुलीने मात्र त्याची भूक ओळखली."
Web Summary : A viral video shows a child dressed as Gandhi begging. Passersby photographed him, but a girl offered him food, recognizing his hunger. The poignant moment highlights compassion amidst indifference.
Web Summary : वायरल वीडियो में गांधी के रूप में एक बच्चा भीख मांग रहा है। राहगीरों ने उसकी तस्वीरें खींची, लेकिन एक लड़की ने उसकी भूख को पहचानकर उसे भोजन दिया। यह मार्मिक क्षण उदासीनता के बीच करुणा को उजागर करता है।