शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
4
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
5
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
6
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
7
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
8
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
9
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
10
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
11
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
12
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
13
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
14
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
15
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
16
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
17
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
18
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
19
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
20
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:50 IST

गुरुग्राममध्ये सीनिअर अकाउंटंट जागृती बारी हिने मॉलच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सीबीआय किंवा पोलिसांऐवजी ती एका ज्योतिषाच्या उपायांवर अवलंबून होती, ज्याच्या चॅट्स आता समोर आल्या आहेत.

शिक्षणाची मोठी पदवी, देशातील नामांकित कंपनीतील सीनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्हचे पद आणि चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या पतीचा बडेजावही आयुष्यातील वादळे शमवू शकत नाही, तेव्हा तिने अंधश्रद्धेचा आधार घेतो. गुरुग्रामच्या प्रसिद्ध वर्ल्डमार्क मॉलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या २४ वर्षीय जागृती बारी हिच्या प्रकरणात आता असाच एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. जागृतीच्या मोबाईलमधून पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सॲप चॅट्सने या आत्महत्येला एक वेगळाच आणि मन हेलावून टाकणारा अँगल दिला आहे.

कायदे, पोलीस किंवा समाजाकडून पूर्णपणे आशा गमावलेली जागृती गेल्या अनेक दिवसांपासून एका ज्योतिष्याच्या संपर्कात होती. ती लपून-छपून त्या ज्योतिषाला आपली कौटुंबिक छळातून सुटका करण्यासाठी आणि तुटणारा संसार वाचवण्यासाठी उपाय विचारत होती. मात्र, जेव्हा नशिबाचे सर्व तोडगे अपयशी ठरले, तेव्हा तिच्या आशेचा शेवटचा धागाही तुटला आणि तिने मृत्यूला कवटाळले.

प्रेमविवाह बनला मृत्यूचा पिंजरा

जागृतीचे आयुष्य २२ नोव्हेंबर २०२३ रोजी बदलले, जेव्हा तिने मेरठच्या राहणाऱ्या अमित सिंघल या सीए तरुणाशी प्रेमविवाह केला. जागृतीला वाटले होते की तिने तिचा जोडीदार निवडला आहे, परंतु हा आंतरजातीय विवाह तिच्यासाठी नरक ठरेल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. अमितच्या घरचे या लग्नाच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिला टोमणे, मानसिक छळ आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला.

जागृतीचा भाऊ हार्दिक याने पोलिसांना सांगितले की, अमित आणि त्याचे कुटुंबीय जागृतीला इतकी बेदम मारहाण करायचे की तिचे शरीर निळ्या खुणांनी भरून जायचे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा तिने भीतीने स्वतःच्या जखमांचे फोटो काढून बहिणीला व्हॉट्सॲपवर पाठवले होते, जे आता पोलिसांकडे सर्वात मोठे पुरावे आहेत.

२४ तासांची 'डिजिटल हेरगिरी' आणि संशयाचा विळखा

एकीकडे शारीरिक छळ तर दुसरीकडे संशयाचे असे जाळे विणले गेले होते, ज्याने जागृतीचे खाजगी आयुष्य पूर्णपणे संपवून टाकले होते. उच्चशिक्षित असलेला पती अमित पत्नीवर २४ तास पाळत ठेवायचा. तो जागृतीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करायचा; ती कधी ऑफिसला पोहोचली, कधी निघाली, कोणाला भेटली, यावर त्याची नजर असायची. एवढेच नाही तर रोज तिच्या फोनचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले जायचे. या डिजिटल हेरगिरीने जागृतीला आतून पूर्णपणे पोखरून काढले होते आणि ती तीव्र नैराश्यात गेली होती.

पोलीस सोडून ज्योतिषावर भरवसा; तोडगे ठरले निकामी

हताश झालेली जागृती कोणा सामाजिक संस्थेकडे किंवा पोलिसांकडे जाण्याऐवजी एका ज्योतिषाच्या आहारी गेली. ती रात्र-रात्रभर चॅटिंग करून आपला संसार वाचवण्याची भीक मागत होती. तो ज्योतिषी तिला कधी पूजा अर्चा, तर कधी काही उपाय करायला सांगायचा. जागृतीही डोळे मिटून ते उपाय करत राहिली. पण दिवसेंदिवस पतीचा छळ कमी होण्याऐवजी वाढतच गेला.

ऑफिसमध्ये हजेरी लावली अन् संपवले जीवन

१३ मे रोजी सकाळी जागृती नेहमीप्रमाणे सेक्टर-६५ मधील वर्ल्डमार्क मॉलमध्ये असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिने कॉम्प्युटर सिस्टममध्ये स्वतःची हजेरी नोंदवली जेणेकरून कोणाला संशय येणार नाही. पण तिच्या डोक्यात मृत्यूचे तांडव सुरू होते. हजेरी लावताच ती वेगाने बाल्कनीच्या दिशेने गेली आणि ५ व्या मजल्यावरून खाली उडी मारली. एवढ्या उंचीवरून पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी पती गजाआड, पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच सेक्टर-६५ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. जागृतीचा भाऊ हार्दिक याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती अमित सिंघल याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी रामबीर यांनी सांगितले की, पती सध्या तुरुंगात आहे, तर जागृतीच्या मोबाईलमधून मिळालेले ज्योतिषाचे चॅट्स आता न्यायालयात मुख्य पुरावे म्हणून सादर केले जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Astrological 'Remedies' Fail, Woman Ends Life; Tragic End for Graduate

Web Summary : Despite education and a seemingly successful marriage, a woman in Gurugram tragically ended her life. Facing marital abuse and digital surveillance, she sought help from an astrologer. When those remedies failed, she lost hope and died.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीhusband and wifeपती- जोडीदार